जाहिरात वाचणे एक चांगली सवय

औरंगाबाद, दि. 10- औरंगाबाद स्मार्ट शहर बस विभागातर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी सोमवार, 12 जुलै पासून शहर बससेवेत आणखी 9 बसेस सुरू करण्यात येत आहे. याशिवाय प्रवाश्यांचा प्रतिसाद आणि 4 वाजेनंतर असलेल्या निर्बंधांमुळे मार्ग क्र. 6, 7, 10, 14 आणि 43 मार्गांवरच्या बस वेळापत्रकात बदल करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या आणि प्रवाश्यांच्या मागणीनुसार मार्ग क्र. 25 सिडको ते रांजणगाव मार्गे हर्सूल टी पॉईंट, दिल्ली गेट, मध्यवर्ती बस स्थानकची बस खालील वेळापत्रकानुसार धावणार आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

6:15, 7:25, 8:35, 9:45, 11:05, 12:15, 14:05, 15:15, 16:25, 17:35, 18:55, 20:10
मार्ग क्र 22 आणि मार्ग क्र. 15 ची बस टिव्ही सेंटर मार्गे धावेल.

मार्ग क्र 22 : सिडको ते रांजणगाव, मार्गे – बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा, टी व्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानक आणि मार्ग क्र 15 : सिडको ते रांजणगाव, मार्गे – जयस्वाल हॉल, टी व्ही सेंटर, गोदावरी पब्लिक स्कुल, हिमायत बाग, दिल्ली गेट, मध्यवर्ती बस स्थानक

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सोमवार, 12 जुलै 2021 पासून मार्ग क्र. 4, 5, 6, 7, 10, 12, 13, 14, 15, 18, 19, 22, 25, 43 अश्या 14 मार्गांवर 41 बसेस बससेवा देतील.

निर्जंतुकीकरण केलेल्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी राहणार आहेत. प्रवासावेळी मास्क, सेनिटायझर वापरणे व शासकीय आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रवाश्यांनी कोविडच्या सर्व नियमांचा अवलंब करून बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन स्मार्ट शहर बस विभागाकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here