ADS 2

औरंगाबाद, दिनांक, 15 -:औरंगाबाद जिल्‍हयातील कोविड -19 महामारीमुळे बंद असलेले सिपेट (CIPET) अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम पुन्‍हा सुरु करण्‍यास अटी व शर्तींच्‍या अधीन राहून परवानगी देण्‍यात येत आहे, असे शशिकांत हदगल, अपर जिल्‍हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.

ADS 3

अटी व शर्ती –

प्रशिक्षण हॉलमध्‍ये प्रत्‍येक प्रशिक्षणार्थी यांच्‍यामध्‍ये किमान 6 चौरस फुट (दो गज की दूरी) या प्रमाणात बैठक व्‍यवस्‍था करावी.

प्रत्‍येक प्रशिक्षणार्थीच्‍या प्रवेशापूर्वी जवळच्‍या मनपा/स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेमार्फत RT-PCR/Antigen Test करणे बंधनकारक राहील, याबाबत खात्री करुनच प्रवेश दयावा.

प्रशिक्षणार्थी व संबंधित सर्वांनी आरोग्‍य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहिल. तसेच सदरील अॅपमध्‍ये प्रशिक्षणार्थीची नाव नोंदणी झाल्‍याबाबतची खात्री करावी.

कोविड-19 अंतर्गत केंद्र शासन/राज्‍य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्‍या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहिल.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी Social Distancing पाळून प्रशिक्षणार्थींमध्‍ये भौतिकदृष्‍टया कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्‍यावी.

सदरील प्रशिक्षणाच्‍या ठिकाणी CAB ( Covid Appropriate Behaviour) चे पालन काटेकोरपणे करावे.

प्रशिक्षणार्थ्‍यांची उपस्थिती नोंदवहीत दररोज अद्ययावत करावी, जेणेकरुन यदाकदाचित संशयित रुग्‍ण आढळल्‍यास कॉन्‍टॅक्‍ट टेूसिंग करणे सोईचे होईल.

दोन बॅचेस मध्‍ये अर्धा तास अवकाश ठेवून प्रत्‍येक वेळी हॉल Sodium Hypochlorite च्‍या द्रावणाने सॅनीटाईज करणे बंधनकारक राहिल.

प्रशिक्षणार्थींच्‍या हॉल प्रवेशाच्‍या वेळी सॅनीटाईजरची किंवा साबणाने हात स्‍वच्‍छ धुण्‍याची व्‍यवस्‍था करावी.

कोविड 19 साथरोग संबंधी, सर्दी, खोकला, ताप, श्‍वसनसंस्‍थेशी संबंधित लक्षणे असणा-या प्रशिक्षणार्थीस प्रवेश देवू नये.

शक्‍यतो प्रशिक्षणार्थ्‍यांनी हॅण्‍डग्‍लोजचा वापर करावा. मास्‍क/फेसकव्‍हर लावणे बंधनकारक राहिल.(No Mask-No Entry……..)

प्रशिक्षणार्थी व त्‍यांच्‍या पालकांचा दूरध्‍वनी क्रमांक घेवून नेहमी संपर्क करावा. तसेच जिल्‍हा प्रशासन, तालुका प्रशासन व आरोग्‍य विभागाचा संपर्क क्रमांक व आरोग्‍य विभागाने दिलेल्‍या सूचना दर्शनी भागात लावाव्‍यात व त्‍या सुचनांचे पालन होईल या दृष्‍टीने कार्यवाही करावी.

प्रशिक्षणार्थींच्‍या कुटुंबात अथवा निवासस्‍थान परीसरात कोविड -19 चा रुग्‍ण नसल्‍याची खात्री करावी.

प्रत्‍येक प्रशिक्षणार्थींचे आरोग्‍य कार्ड तयार करुन शारिरीक तापमान, सर्दी, खोकला यांच्‍या दैनंदिन नोंदी ठेवाव्‍यात. तसेच दररोज प्रशिक्षणार्थींचे तापमान (Thermal Screening) व O2 Level याची Pulse Oxymeter वर नोंद घेऊन नोंदवहीमध्‍ये नोंद करावी.

कोविड-19 शी संबंधित वेळोवेळी निर्गमित होणारे शासन परीपत्रक, आदेश, निर्णय व या कार्यालयाचे आदेशाचे पालन करण्‍यास कसूर केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास संबंधित संस्‍थेत जबाबदार धरुन तात्‍काळ संस्‍था सील करण्‍यात येईल.

वरील अटी व शर्तींचे पालन न करणारी संस्‍था अथवा समुह, उल्‍लंघन करणारी कोणतीही व्‍यकती यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व नियमानुसार कारवाई करण्‍यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे शशिकांत हदगल, अपर जिल्‍हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा