जाहिरात वाचणे एक चांगली सवय

औरंगाबाद, दि. 21 : – एक रिक्षा व दोन मोटारसायकली चोरणारे दोन चोरटे सिडको पोलिसांच्या जाळ्यात अडकले. एक चोरटा सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील असून दुसरा औरंगाबाद शरहातील मिसारवाडी परिसरातील आहे. त्यांच्या ताब्यातून एक LPG रिक्षा व दोन होंडा कंपनीच्या मोटार सायकली असा एकूण- २,३०,००० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २०/०६/२०२१ रोजी सिडको पोलीस ठाणे विशेष पथकाचे अधिकारी व अंमलदार हद्दीत वाहन चोरी व मंगळसूत्र चोरी करणा-यांचा शोध घेत होते. पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहीती मिळाली की, दोघे जण चोरीची रिक्षा घेवून मिसारवाडी भागात थांबलेले आहेत, अशी खात्रीलायक माहीती मिळाली. ही माहीती पोलीस निरीक्षक यांनी सिडको विशेष पथकाचे अधिकारी पोउपनि कल्याण शेळके व त्यांचे सोबतचे अंमलदार यांना देवून सूचना व दिशा निर्देश दिले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्याप्रमाणे पोलिसांनी मिसारवाडी भागात जावून त्या दोघांचा व रिक्षाचा शोध घेतला. मिसारवाडी गल्ली नं. ०७ मध्ये एका LPG रिक्षामध्ये दोघे जण बसलेले दिसले. पोलीसांनी त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) प्रदीप लक्ष्मण शेळके (३५, चालक, रा. भराडी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद), २ ) विनोद नारायण त्रिभुवन (३०, रा. मिसारवाडी, गल्ली नं. ०७ औरंगाबाद) असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांना त्यांच्या ताब्यातीन बजाज कंपनीची रिक्षा (MH – २०, EK – ०९३८) बाबत विचारपूस करून कागदपत्रांची मागणी केली. त्यांनी सदर रिक्षाचे कागदपत्र नसल्याचे सांगून उडवा-उडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलीसांचा संशय बळावला. त्यामुळे त्या दोघांना अधिक विश्वासात घेवून रिक्षाबाबत विचारपुस केली असता त्या दोघांनी सांगितले की, सदर रिक्षा ही तीन दिवसांअगोदर एन -६ सिडको भागातून रात्री १०.०० वाजेच्या दरम्यान चोरून आणल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावरून पोलिसांनी या रिक्षासंदर्भात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे अभिलेखाची पाहणी केली असता सदर LPG रिक्षा (MH – २०, EK – ०९३८) बाबत गु.र.नं. ४५१/२०२१ कलम ३८९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. ही रिक्षा नमुद गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्या दोघांच्या ताब्यात सदर ठिकाणी आणखी दोन मोटारसायकली मिळून आल्या. या मोटारसायकलीसंदर्भात त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारले असता दोघांनी सांगितले की, यापैकी एक मोटारसायकल (MH – २०, BF – ३४४२) ही आज दुपारी एन -१ सिडको भागातील पेट्रोलपंपा जवळून व दुसरी मोटारसायकल (MH – १७, BK – ४४२१) ही मागील चार महिन्यांपूर्वी शरद टि पॉईंट जवळील प्यासा वाईन शॉप समोरून चोरी केली आहे असे सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सिडको विशेष पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन्ही आरोपींना पकडून त्यांच्या ताब्यातुन एक LPG रिक्षा व दोन होंडा कंपनीच्या मोटार सायकली असा एकूण- २,३०,००० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सिडको पोलीस ठाणे येथील ०१ रिक्षा चोरीचा गुन्हा व अन्य पोलीस ठाणेचा एक असे गुन्हे उघडकीस आणले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ही कार्यवाही पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप – आयुक्त परिमंडळ २ दीपक गि-हे, सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग निशीकांत भुजबळ, सिडको पोलीस ठाणे वरिष्ट पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप – निरीक्षक कल्याण शेळके, पोलीस अंमलदार सुभाष शेवाळे, गणंश नागरे, सुरेश भिसे, विशाल सोनवणे, स्वप्नील रत्नपारखी यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ नलावडे करीत आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here