महाराष्ट्र
Trending

दुरूस्ती व देखभालीसाठी एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा बंद ! उद्या सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत महावितरणची कसरत तर ग्राहकांची गैरसोय !!

नांदेड दि. ५ एप्रिल : वीजवाहिन्यांच्या दुरूस्ती व देखभाली करिता नांदेडच्या एमआयडीसी परिसरातील काही भागाचा वीजपुरवठा गुरूवारी (दि.६ एप्रिल) सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत बंद राहील. संबंधीत औद्योगिक वीजग्राहकांनी नोंद घेवून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या एमआयडीसी परिसरातील औद्योगिक वीजग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब व लघुदाब वाहिनींच्या देखभाल दुरूस्ती करिता ३३ केव्ही आरटीओ वीजवाहिनीवर सर्व एक्सप्रेस वाहिनीवरील औद्योगिक वीजग्राहकांचा तसेच काही घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहील.

यामध्ये ११ केव्ही गोदावरी एक्स्प्रेस वाहिनी, ११ केव्ही नांदेड फ्लोअर मिल वाहिनी, ११ केव्ही आर टी ओ वाहिनी,११ केव्ही सत्य साई वाहिनी तसेच ११ केव्ही जपाली वाहिनी अशा एकूण पाच वीजवाहिनींचा समावेश आहे. वीजपुरवठा बंद असलेल्या काळात सर्व औद्योगिक वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणे केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!