ADS 2

औरंगाबाद, दि. 14 : पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण यांचे आस्थापनेवरिल 183 पोलीस अंमलदार यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून पदोन्नतीच्या कोटयातील सर्व रिक्त पदे ही पदोन्नती समितीने पात्र ठरविलेल्या पोलीस अंमलदार यांना सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय एसपी मोक्षदा पाटील यांनी घेतला आहे. तसे आदेश आज, 14/09/21 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

पदोन्नती हा कोणत्याही सेवेत कार्यरत असणा-या व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा व आनंदाचा क्षण असतो. औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच इतक्या मोठया प्रमाणात पोलीस अंमलदार यांची पदोन्नती एकाच वेळेस झाली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या गणेशत्सोवात पोलीस अंमलदार यांना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या भेटीमुळे पोलीस अंमलदार यांचेमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र पोलीस अंमलदार यांना त्याचे पद निहाय पुढील प्रमाणे पदोन्नती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये 75 पोलीस शिपाई हे पोलीस नाईक तर 61 पोलीस नाईक हे पोलीस हेड कॉन्सटेबल, व 47 पोलीस हेडकॉन्सटेबल सहाय्यक फौजदार म्हणून पदोन्नत करण्यात आले आहे. पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा