Advt A
Home ताज्या बातम्या राज्यात एमपीएससीच्या जागांची भरती करणार; मंत्रिमंडळाचा निर्णय – अजित पवार

राज्यात एमपीएससीच्या जागांची भरती करणार; मंत्रिमंडळाचा निर्णय – अजित पवार

मुंबई दि. २३ सप्टेंबर – राज्यात एमपीएससी पदांच्या रिक्त जागांचा प्रश्न प्रलंबित असताना ही भरती करण्यावर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील एमपीएससी रिक्त पदे भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही देण्यात आल्याचे सांगताना त्यानंतर या जागांच्या जाहिराती जाहीर केल्या जातील अशी माहितीही अजित पवार यांनी माध्यमांसमोर मांडली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यासोबतच देशातील प्रत्येक राज्यात सैनिक भरती होत असते. मात्र कोरोना संक्रमणामुळे महाराष्ट्रात ही सैनिक भरती मागील काळात झालेली नाही. राज्यात त्यामुळे ही सैनिक भरती संपूर्ण नियमांचे पालन करून घेण्यात यावी. तसेच राज्यात कुठेही सैनिक भरती असल्यास त्याची संधी मुला-मुलींना मिळण्यात यावी अशा सूचना राज्य सरकारने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

error: Content is protected !!