जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

औरंगाबाद, दि.१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. कोविड महामारीच्या संकटावर मात करून विद्यापीठाने नियोजन केले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा मार्च, एप्रिल व मे महिन्यात घेण्यात आल्या. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परीक्षा पार पडली. या परीक्षेत ३१ मे पर्यंत विविध निकाल जाहीर झाले. यामध्ये बी.एड, बीपीएड, एम.कॉम, एम.कॉम (ई-कॉमर्स), बी.ए.(ऑनर्स), बी.सी.ए.(विज्ञान), बी.एस्सी (आयटी), बी.एस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बायेटेक, डी.बी.एम, बी.बी.ए, बी.सी.ए आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

‘बीए,बीकॉम‘चा निकाल चार दिवसांत
दरम्यान, पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक विद्यार्थी हे बीए, बी.एस्सी व बी.कॉम या अभ्यासक्रमाचे आहेत. यामध्ये बी.ए व बी.कॉमचा निकाल येत्या आठवडयाच्या अखेर तर बीएस्सीचा निकाल पुढील आठवडयात घोषित होईल, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here