जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

औरंगाबाद, दि. १० – गंगापूर तालुक्यातील आसेगाव ग्रामपंचायत येथील सरंपच पद जिल्हाधिकाऱ्यांद्वारा रद्द करण्यात आले असून तत्कालीन निर्वाचन अधिकारी यांच्यावर नियमभंग केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

गंगापूर तालुक्यातील आसेगाव ग्रामपंचायतीची सरंपचपदाची जागा ही एससी महिला प्रवर्गासाठी राखीव होती. तत्कालीन निर्वाचन अधिकारी डी.जी.पगार होते.याठिकाणी सविता राजगुरु आणि गिरीजा बागूल या दोन सदस्यां एससी महिला प्रवर्गातील सदस्या होत्या. वास्तविक सविता राजगुरु यांचा मूळ प्रवर्ग हा एससी आहे. मात्र त्या खुल्या प्रवर्गातुन निवडून आल्या या कारणाने निर्वाचन अधिकारी पगार यांनी त्यांचे नामनिर्दैशन पत्र रद्द् केले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच आठ फेब्रुवारी 2021 तारखेची विशेष सभा तहकुब करण्यात आली आणि 9 फेब्रुवारीला सविता राजगुरु यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी दाद मागितली. त्यावर उच्च न्यायालयाने दुपारी २.४५ वा. सविता राजगुरु यांचे नामनिर्दैशन पत्र स्वीकारण्यात यावे, असे आदेश दिले होते.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सदरच्या आदेशाबाबत निर्वाचन अधिकारी पगार यांना संबंधित सरकारी अभियोक्ता तसेच राजगुरु आणि गंगापूर तहसिलदार यांनी कळविले होते. मात्र तरी सुद्धा साडेतीन वाजता बैठक पुन्हा सुरु झाल्यावर उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही पगार यांनी राजगुरु यांचे नामनिर्दैशन पत्र स्वीकारले नाही. तसेच गिरीजा बागुल यांना बिनविरोध सरपंच घोषीत केले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे सविता राजगुरु यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे सदर निवडणुकीच्या वैधतेबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३३(५) अन्वये विवाद उपस्थित केला. सदर प्रकरणात सर्व संबंधितांची सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी यांनी सदर सरपंच पदाच्या निवडणूकीत निर्वाचन अधिकारी पगार यांनी गैरप्रकार केल्याने आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने सदर निवडणूकीची प्रक्रिया अवैध ठरवली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सदर ग्राम पंचायतीचे सरपंच रिक्त घोषीत केले आहे. तसेच तहसलिदार गंगापूर यांना सदर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नव्याने घेण्याचे आदेश दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी संबंधित निर्वाचन अधिकारी पगार यांनी सदर निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार केल्यामुळे यांच्यावर खातेनिहाय कारवाईचे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here