ADS 2

औरंगाबाद, दिनांक 15 -: औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 26 सप्टेंबर पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 144 कलम लागू
औरंगाबाद, दिनांक, 15 -: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) प्रमाणे लागू केलेले मनाई आदेश यापुढे 19 सप्टेंबर पर्यंत लागू राहतील, असे आदेश पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा. दं. वि 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरूद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्थ सर्व परिमंडळ अधिकारी, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व इतर शाखांचे प्रभारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण भागात 37(1)(3) कलम लागू
औरंगाबाद, दि.15 –
औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या 37(1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत दिनांक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे शशिकांत हदगल, अपर जिल्‍हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा