ADS 2

औरंगाबाद, दि. 12 -: राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी रविवारी (१२ सप्टेंबर) महावितरण व महापारेषणच्या विविध विकास कामांची पाहणी केली. महावितरणच्या कामाबाबत त्यांनी लाभार्थ्यांशी चर्चा करून समाधान व्यक्त केले.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

वाघमारे यांनी शेंद्रा येथे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सुभाष कचकुरे यांच्याकडे बसविण्यात आलेल्या सौर कृषिपंपाची पाहणी केली. तसेच ढगाळ वातावरणात पाऊस चालू असतानाही सौरपंप काम करतो, हे त्यांनी सौरपंप चालू करून दाखवले. सौरपंपामुळे दिवसा वीज मिळत असल्याने याआधी होणारी गैरसोय टळली असल्याचे सांगितले. यानंतर वाघमारे यांनी शेंद्रा एमआयडीसी उपकेंद्रातील उपलब्ध जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली. या सौर ऊर्जा प्रकल्पातून कमी दरांद्वारे किती वीज निर्मिती होते आणि सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून किती वीज निर्मिती झाली, हे त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेकटा येथील उच्चदाब वितरण प्रणाली योजनेचे लाभार्थी ग्राहक त्रिंबक घोडके यांच्या शेतातील वीजजोडणीची पाहणीही वाघमारे यांनी केली. यापूर्वी एकाच रोहित्रांवर अनेक जोडण्या असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन रोहित्र नादुरुस्त होत असे. आता एका रोहित्रावर माझी एकट्याचीच वीजजोडणी असल्याने रोहित्र बिघाडाची काळजी मिटली आहे. तसेच उच्चदाब वाहिनीवरून थेट शेतात जोडणी आल्याने योग्य दाबाने शाश्वत व सुरळीत वीजपुरवठा होत आहे, असे ग्राहक त्रिंबक घोडके यांनी सांगितले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, महापारेषणचे मुख्य अभियंता श्रीराम भोपळे, औरंगाबाद ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने, उपकार्यकारी अभियंता सुनील शिंदे, सहायक अभियंता मनीष मगर, मनीष डिघुळे, बाळासाहेब बर्वे, योगेश चेंडके यांच्यासह महावितरण, महापारेषणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

महापारेषणच्या कामांचाही घेतला आढावा
दरम्यान, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे यांनी दोनदिवसीय औरंगाबाद दौऱ्यात शनिवारी (११ सप्टेंबर) पारेषण कंपनीच्या एकतुनी येथील ७६५ केव्ही उपकेंद्रास भेट देऊन तेथील संचलन व सुव्यवस्थेची माहिती घेतली. तसेच उपकेंद्राशेजारी रिक्त जागेवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची सूचना केली. तसेच त्यांनी पारेषण कंपनीच्या औरंगाबाद परिमंडलातील अभियंत्यांची आढावा बैठक घेतली. त्यात विविध प्रकल्प व चालू असलेल्या विविध कामांच्या प्रगतीच्या अनुषंगाने माहिती घेऊन त्याबाबत काही सूचना केल्या.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा