ADS 2

औरंगाबाद, दि. 24 : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट करून माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे होणार असून त्यासाठी बैठकही घेण्यात आल्याचे छायाचित्र प्रसारीत केलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे औरंगाबादमध्ये प्रस्तावित असून त्याकरिता जागाही निश्चित करण्यात आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली राज्य शासनाने क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

ADS 3

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच करण्यात यावे इतरत्र हलविण्यात येवू नये असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथेच होणार असून त्यासाठी जागाही निश्चित झालेली असल्याचे आश्वासित केले होते. मग क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करून मराठवाड्यावर नेहमीप्रमाणे अन्याय का करण्यात आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद जवळ करोडी येथे मंजूर झाले होते. गंगापूर तालुक्यातील वाळूज येथे क्रीडा सुविधा उभारल्या जाणार होत्या. जे औरंगाबादला मंजुर केले होते ते पुण्याला चालले आहे. विद्यापीठ औरंगाबाद येथे व्हायला पाहिजे. चार वर्षे सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून करोडी येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागा निश्चित करण्यात आली होती. मराठवाड्याचे सर्व कार्यालये इतरत्र हलवले जात आहे. क्रीडा विद्यापीठाबाबत तसे होवू नये, अशी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला विनंती केली. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला प्रस्तावित झाले होते जागाही उपलब्ध आहे मग इतरत्र हलविण्याचा प्रश्नच येत नाही, विद्यापीठ औरंगाबादलाच करावे अशी आग्रहाची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला केली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

मागच्या भाजपा व शिवसेना युती सरकारने सुध्दा अन्यायच केला
वर्ष २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनाचे सरकार होते त्यावेळी सुध्दा औरंगाबादवर अन्याय करण्यात आला होता. औरंगाबादला मंजुर झालेले एआयआयएमएस इन्सटिट्युट तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी नागपुरला स्थलांतरीत केले होते. इंटरनॅशनल इन्सटिट्युट ऑफ प्लानिंनग अ‍ॅण्ड आर्कीटेक्चरही मंजुर झाले होते, परंतु त्यावर सुध्दा आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रवादी समोर शिवसेनाने टेकले गुडघे
औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे ५ आमदार व २ मंत्री असतानासुध्दा औरंगाबादेत प्रस्तावित असलेले व जागा सुध्दा निश्चित झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ शिवसेनेच्या नाकाखालून पुण्याला पळवण्यात राष्ट्रवादी काँगे्रसला यश आले. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे महत्व किती आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता उघड झालेले आहे. औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त दोनच आमदार असतानासुध्दा त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करून दाखविले. पुणे शहर हे सुरवातीपासुनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून तेथे अगोदरपासूनच अद्यावत बालेवाडी स्टेडिअम आहे तसेच याव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रासाठी विविध प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध असतानासुध्दा राष्ट्रवादीने राजकीय फायदा घेत पुणे येथे क्रीडा विद्यापीठ पळवले असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा