जाहिरात वाचणे एक चांगली सवय

पुणे, दि.9 :-औरंगाबाद मधील क्रांती चौक येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारुढ पूर्णाकृती पुतळयाची उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ नऱ्हे- धायरी पुणे येथे आज, 9 जुलै रोजी पहाणी केली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार संजय क्षीरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता पानझडे, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

मंत्री देसाई म्हणाले की, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे व त्यांच्या सहकार्यांनी बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्र्वारुढ पूर्णाकृती पुतळा हा एकवीस फुट उंच व बावीस फुट लांब आणि सहा टन वजनाचा आहे. हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हा पुतळा अतिशय रेखीव व देखीव असा झालेला आहे. या पुतळयाचे काम लवकरच पूर्ण होईल. क्रांती चौक औरंगाबाद येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदर्श असा शिवपुतळा ठरेल अशा भावनाही देसाई यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी स्थानिक शिवप्रेमी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here