जाहिरात वाचणे एक चांगली सवय
Advertisement

जालना, दि. 10 – पाझर तलावात बुडून तीन भावडांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बदनापूर तालुक्यातील कुसळी परिसरात आज, 10 जून रोजी घडली. शेताच्या परिसरात शेळ्या चारत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्देवी घटना घडली. तिन्ही मुले वस्तीशाळेत शिक्षण घेत होते. सध्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने ते घरीच होते व शेताच्या परिसरात शेळ्या चारत असायचे.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात वाचणे एक चांगली सवय

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुसळी येथे बैलभरा शिवारात पाझर तलाव आहे. या तलाव परिसरात अंकुश वैद्य यांची शेत जमीन असून ते आपल्या कुटुंबासह शेतात राहतात. आज, 10 जून रोजी दुपारी अंकुश वैद्य यांची मुलगी दीपाली (10), मनोज (11) व अक्षय संजय वैद्य (7) हे तिघे जण व अन्य एक जण असे चौघे शेळ्या चारत होते.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, मनोज अंकुश वैद्य हा पाझर तलावाजवळ गेला. अंकुशला अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. पाण्यात बुडत असताना अक्षय संजय वैध हा त्याला बघण्यासाठी गेला आणि तो देखील बुडाला. दरम्यान, आपले दोन्ही भाऊ पाण्यात बुडताना पाहून दीपाली वैध ही त्यांना वाचवण्यासाठी गेली. मात्र, तीही पाण्यात बुडाली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, पाझर तलाव परिसरात असलेल्या एका मुलाने परिसरातील नागरिकांना माहिती दिली. ही माहिती मिळताच अंकुश वैध व अन्य काही जणांनी तातडीने पाझर तलाव गाठला. काही जणांनी लगेच पाझर तलावात शोध घेतला असता तिघे मृतावस्थेत आढळले. सायंकाळी 6 वाजता त्यांचे मृतदेह हाती आले. घटनास्थळी पोलीस व महसुल कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, त्यांचे मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात वविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

Advertisement
जाहिरात वाचणे एक चांगली सवय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here