ADS 2

वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प विशेषबाब म्हणून पूर्ण करा, खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत जलविकासाचा आढावा

ADS 3

औरंगाबाद, दि. 22 -: जायकवाडी धरण सलग तीन वर्षापासून पूर्ण भरत असताना सुध्दा शहरात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या फार जुनी झाल्याने व समांतर जलवाहिनी घोटाळ्यात अडकली महानगरपालिकाने वेळेवर नियोजनबध्द उपाययोजना केली नसल्यामुळे नागरीकांना वेळेवर मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याची खंत व्यक्त करून खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, वैजापूर तालुक्यातील वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण असून प्रकल्प पूर्ण झाल्यास दुष्काळातही परिसरातील सर्व गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयात वाकला – चांदेश्वर प्रकल्प व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासंबंधी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

वाकला – चांदेश्वर साठवण तलाव हा प्रकल्प औरंगाबाद व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैजापूर तालुक्यातील वाकला गावाजवळ तापी खोऱ्यातील हत्तीघोडा नाल्यावर आहे. सदरील प्रकल्प वेळेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे असल्याने गोदवरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे मागील ३ वर्षांपासून खासदार इम्तियाज जलील सतत पाठपुरावा करत आहे. मध्यंतरी काळात हा प्रकल्प ६०० हेक्टर्स पेक्षा कमी सिंचन क्षमतेचा असल्यामुळे जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याने कामास अधिक विलंब झाला. खासदार इम्तियाज जलील यांनी सदरील प्रकल्प विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाकडे परत हस्तांतरण करण्याचे सूचना दिल्या.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांनी मन्याड प्रकल्पाच्या जलनियोजनात पाण्याची तुट येणार असल्याने वाकला – चांदेश्वर प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यामुळे आजतागायत प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी दुष्काळ परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी पंचक्रोशीत गावातील ग्रामस्थांची होणारी भटभटकंती पाहता विशेष बाब म्हणून पाणी उपलब्धता प्रमाणपत्रास पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे सुचना केल्या.

तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांच्याशी समन्वय साधून विशेष बाब म्हणून मान्यता घेण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. सदरील बैठकीमध्ये जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, गोदावरील मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता मनोज अवलगांवकर व पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता पाटोळे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना पैठण मधील भाग – २ व गंगापूर मधील भाग ३ प्रकल्प तसेच शिवना टाकळी व वाकोद या बांधकामाधीन मध्यम प्रकल्पांची सद्य:स्थितीवर सविस्तर चर्चा करून प्रगतीपथावरील कामे गुणवत्तापुर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्प, ६३ लघु प्रकल्प, ४ बंधारे, २ अनिकट व खाम बंधारा अशा एकूण ८० सिंचन प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमता व पाणी पातळी अहवालाची माहिती घेवून खासदार इम्तियाज जलील यांनी सदरील सर्व प्रकल्पांची पुर्ण संचय पातळी, लघुत्तम जल पातळी, पुर्ण जल क्षमता, उपयुक्त साठा, अनुपयुक्त साठा, एकूण लाभक्षेत्र लावडी लायक क्षेत्र, सिंचित क्षेत्र / निर्मित सिंचन क्षमता विषयी चर्चा करून परिसरातील गावातील ग्रामस्थांना पाण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची अडचण होणार याची दक्षता घेवुन वेळेवर सुविधा देण्याचे सूचना केल्या.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

बैठकीमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी जायकवाडी धरणातील संकल्पीत पाणीसाठा, गाळ काढणे, पिण्याचे पाण्याचे व उद्योगधंदे करिता पाण्याचे आरक्षण विषयी चर्चा केली. जायकवाडी धरण सलग तीन वर्षापासुन पूर्ण भरत असताना सुध्दा शहरात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या फार जुनी झाल्याने व समांतर जलवाहिनी घोटाळ्यात अडकली महानगरपालिकाने वेळेवर नियोजनबध्द उपाययोजना केली नसल्यामुळे नागरीकांना वेळेवर मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याची खंत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. शहराला ४ टिएमसी पाणी पुरवठ्याची गरज असताना सद्यस्थिती फक्त १.५ टिएमसी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरीकांना पाण्याची भटकंती करावी लागत आहे, शहरात सध्या नविन १६८० कोटी रुपयाची जलवाहिनी योजनाचे काम प्रगतीपथावर असुन काम पूर्ण झाल्यावर मुबलक पाणी मिळणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

सदरील बैठकीमध्ये जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता मनोज अवलगांवकर, कडा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, लघु प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता गोडसे, जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठणचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, सहाय्यक मुख्य अभियंता शिंदे, उपअधिक्षक अभियंता तानवडे, सहाय्यक मुख्य अभियंता शबाना रझवी, वैजापूर तालुक्याचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांच्यासह इतर संबंधित प्रकल्पाचे अधिकाऱ्यांची उपस्थितीत होती.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा

ADS 4