महाराष्ट्र
Trending

जालन्यात मुलीची छेड काढली म्हणून फायटरने मारहाण, म्हाडा कॉलनीत राडा !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – तू कोणत्या मुलीची छेड काढली म्हणून शेजारी तिघांनी युवकाला मारहाण केली. तिघांपैकी एकाने युवकाच्या डोक्यात फायटरने मारहाण करून जखमी केले. ही घटना तालुका जालना पोलिस स्टेशन हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

जॉकी राजु खंदारे (वय 19वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. म्हांडा कॉलनी ता जि जालना) असे जखमी युवकाचे नाव आहे. जॉकी खंदारे याने पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दि-24/04/2023 रोजी रात्री 09.00वाजेच्या सुमारस घरी होतो. त्यावेळी शेजारी राहणारे तिघे जॉकी खंदारे याच्या घरी आले.

त्यांनी जॉकी खंदारे यास तू कोणत्या मुलीची छेड काढली आहे, असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी माराहण केली. त्या तिघांपैकी एकाने जॉकी खंदारे याच्या डोक्यात उजवे बाजुला फायटरने मारून डोक फोडून जखमी केले.

याप्रकरणी याने दिलेल्या तक्रारीवरून तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!