टॉप न्यूज
Trending

एन ९ व एम २ रोडवरील ३० अतिक्रमणे काढली ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची कारवाई !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.१५ – उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज सकाळी एन ०९ सिडको फरशी मैदान, टपरी मार्केट एम टू रोड या परिसरातील ३० अतिक्रमण धारका विरुद्ध कारवाई करण्यात आली. या परिसरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी परिसरातील सरकारी नाल्यावर एक दूध टपरी, एक पान टपरी टाकून नाल्यांमध्ये अतिक्रमण केले होते. सदर दोन्ही टपऱ्या जप्त करण्यात आल्या.

याच बाजूला सोनवणे यांनी सामासिक अंतर व ऑड शेप च्या जागेत पंधरा बाय पंधरा आकाराची रसवंतीचे अतिक्रमण काढण्यात आले. यानंतर सदर पथकाने एम ०२ रोडवर फरशी मैदान लगत असलेले 20 दुकाने मार्केट या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर दहा फूट पर्यंत मोठे ओटे बांधून अतिक्रमण केले होते. यामध्ये कासलीवाल पिठाची गिरणी व पुढे आईस गोला या नावाचे दुकाने चे अतिक्रमण काढले.

या अतिक्रमण धारकांनी अंदाजे दहा बाय दहा आकाराचे मोठे ओटे बांधून रस्ता अडवला होता. यामुळे वाहतुकीची कोंडी होवून अपघात होत होते आणि नागरिकांना पायी चालण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात आले. एम टू परिसरात काही औषधी विक्रेत्यांनी रोडवर दुकानाचे बोर्ड लावले होते सदर बोर्ड जप्त करण्यात आले.

तसेच पथक क्र ०२ पथकाने एन ०३ परिसरातील सामासिक अंतर आणि रस्त्यावर असलेले अतिक्रमणे काढली. या भागातील अनेक नागरिकांनी निवासी प्लॉटमध्ये कमर्शियल ऍक्टिव्हिटी सुरू केल्याने आणि पार्किंग जागा न सोडल्याने पूर्ण रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो आणि याच बाजूला उच्च न्यायालय असल्याने नागरिकांना विनाकारण वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिक स्वतःहून आपली अतिक्रमण काढत आहे ही कारवाई सतत सुरू राहणार आहे.

ज्या नागरिकांनी सामासिक अंतर व रस्त्यावर शेड बांधून अतिक्रमण केले आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कारवाई प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशक अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, सिडको चे उदय चौधरी, मीनल खिल्लारे, पूजा भोगे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी, मझहर अली, रामेश्वर सुरासे, सिडको एन ०७पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी पोलीस बंदोबस्त दिला.

यासोबतच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!