छत्रपती संभाजीनगर
Trending

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०० कोटींच्या घोटाळ्यानंतर खा. इम्तियाज जलील आक्रमक ! सर्व सहकारी बॅंका व पतसंस्थांची हमी सरकारने घ्यावी, अन्यथा ठेवीदार पैसे काढून घेणार !!

सहकारी बँका व पतसंस्थामधील गोरगरीबांच्या पैशांची जबाबदारी सरकारने घ्यावी; खासदार जलीलने दिला दोन दिवसांचा अल्टिमेटम

Story Highlights
  • सरकारने अधिवेशनात घोषणा करावी; अन्यथा ! महाराष्ट्रातील ठेवीदार आपआपले पैसे काढतील

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० : सहकारी बँका व पतसंस्थांमधील ठेवीदारांचा प्रत्येक रुपया सुरक्षित आहे; आणि जर ते बुडाले तर सरकार ६ महिन्यांच्या आत व्याजासह मुद्दल परत करेल ही घोषणा करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अधिवेशनात सरकारने घोषणा केली नाही तर महाराष्ट्रातील ठेवीदारांना सर्व पैसे काढून घेण्याचे आव्हान केले जाणार असून याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानसभेत जनतेच्या हिताचे निर्णय न घेता फक्त इतरत्रच मुद्यांवर चर्चा केली जात असून तीन इंजिनच्या सरकारने संपूर्ण सहकार क्षेत्रच वार्‍यावर सोडल्याने महाराष्ट्रातील सहकारी बँका व पतसंस्था गोरगरीब, कष्टकरी, वयोवृध्द नागरिक तसेच शेतकरी बांधवाच्या आयुष्याची जमापुंजी घेवून पळत असल्याचे गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर लावले.

सरकारचा सहकार क्षेत्रावर नियंत्रण न राहिल्याने सहकारी बँका व पतसंस्थामधील संचालक मंडळ ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांची बिनधास्तपणे खुलेआम लूट करत आहे; गोरगरीबांची होणारी लूट थांबवणे सरकारची संपूर्ण जबाबदारी असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गोरगरीब, वयोवृध्द, कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांनी आयुष्याची सर्व जमापुंजी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ठेवले होते. परंतु सबब पतसंस्था व बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सीए व ऑडिटर्स यांनी संगणमताने कोट्यावधी रुपयांचा आर्थिक महाघोटाळा व पैशांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २०० कोटी रुपयांचा महाघोटाळा-  आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २०० कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाल्याचे समोर आल्याने सर्व ठेवीदार चिंताग्रस्त होवून त्यांना अश्रु अनावर होत आहेत. पतसंस्थेच्या शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाखांमध्ये हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून मागणी करूनही ठेवीदारांना पतसंस्थेकडून पैसे देण्यासाठी केवळ तारीख पे तारीख दिली जात होती. ठेवीदार पतसंस्थेच्या शाखांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, व्यवस्थापकांकडून ठेवीदारांना तारीख देऊन तुम्हाला पैसे अमुक तारखेला मिळतील असे सांगून केवळ भूलथापा दिल्या जात होत्या. दुर्देवी बाब म्हणजे एका ठेवीदाराने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील दिली.

Back to top button
error: Content is protected !!