छत्रपती संभाजीनगर

मी तुझ्यावर प्रेम करतो… तू जर माझा मोबाईल नंबर ब्लॉक केला तर तुला बघून घेईन !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – मी तुझ्यावर प्रेम करतो… तू जर माझा मोबाईल नंबर ब्लॉक केला तर तुला बघून घेईन, अशी धमकी दिल्याची घटना पोलिस कॉलनी पडेगाव परिसरात घडली.

आकाश भडके (वय २३ वर्षे, रा. तारांगनच्या पाठीमागे, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. छावणी पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल कण्यात आला आहे. पोना शेख पुढील तपास करत आहे.

यातील आरोपीने फिर्यादी सोबत पाणी वाटप करण्याच्या बाहन्याने फिर्यादीचा मोबाईल नंबर प्राप्त करून घेतला. फिर्यादीचा पाठलाग करून इच्छा नसतांना बोलन्याचा प्रयत्न केला. तू माझ्या सोबत चल असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीच्या मनास लाज वाटेल असे कृत्य केले. तसेच कॉल करून तू माझ्या सोबत का बोलत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणून तू जर माझा मोबाईल नंबर ब्लॉक केला तर तुला बघुन घेईन अशी धमकी दिली.

Back to top button
error: Content is protected !!