कन्नडछत्रपती संभाजीनगरवैजापूर

वैजापूरचा डमी परीक्षार्थी पकडला, केंद्रिय सशस्त्र पोलीस बलाच्या परीक्षेत कन्नडमधील उमेदवाराच्या जागेवर औरंगाबादेत परीक्षा देताना जाळ्यात !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ –  केंद्रिय सशस्त्र पोलीस बलासह विविध विभागांच्या शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मित्राच्या जागेवर परीक्षा देताना डमी उमेदवार जाळ्यात अडकला. डिव्हिजनल मॅनेजर व सेक्युरेटि गार्डच्या सतर्कतेमुळे ही तोतयेगिरी उघडकीस आली.

अविनाश सजन गोमलाडु (वय 21 वर्षे रा. शिवगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद) व विकास शाहूबा शेळके (वय 23 वर्षे रा. टाकळी पो. मोहरा ता कन्नड जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. अविनाश हा त्याचा मित्र विकासच्या जागेवर परीक्षेसाठी हॉलमध्ये जात असताना संशय आल्याने त्याला पकडले.

एक ATM ट्रान्समीटर ज्यामध्ये VI कंपनीचे सिम, ब्लुटुथ डिव्हाईस, MicSpy कंपनीचे काळ्या व पिवळ्या रंगाचे मख्खी एअर फोन, सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट आदी १५ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

यासंदर्भात आय ऑन डिजिटल झोन येथील डिव्हिजनल मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, सुमारे आठ वर्षांपासून आय ऑन डिजिटल झोन (MIDC सिडको, औरंगाबाद रा. उल्कानगरी प्लॉट क्र. 83, गारखेडा परिसर, औरंगबाद) येथे डीव्हीजनल मॅनेजर म्हणून ते कार्यरत आहेत. आय ऑन डिजिटल झोनचे मालक भूषण मालपाणी असून टाटा कन्सलटन्सी सर्विसेस या कंपनीला सदरची बिल्डींग आठ वर्षांपासून भाडे तत्वावर देण्यात आली आहे. आय ऑन डिजिटल झोन हे विविध प्रकारच्या स्टाफ सिलेक्शनशी संबंधीत परीक्षा घेतात. सेंटर वर होणा-या सर्व परीक्षा मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील यांच्या देखरेखीखाली होतात.

दि. 01/02/2023 रोजी सकाळी 09.00ते 10.00 च्या दरम्यान केंद्रिय सशस्त्र पोलीस बल (CAPF) एस.एस.एफ मध्ये कॉन्सस्टेबल (GD), आसाम रायफल्समध्ये रायफल्समॅन (GD) व नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये शिपाई परिक्षा- 2022 ( पेपर 1) होती. परीक्षार्थीचे हॉल तिकिट पाहून त्यांना 07.45 ते 08.30 दरम्यान परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. परीक्षेसाठी 800 परिक्षार्थींपैकी 533 परिक्षार्थी आले होते.

परीक्षेचा वेळ 09:00ते 10.00 अशी होती. आय ऑन डिजिटल झोनचे ग्राऊंड फ्लोअरवरील B ब्लॉक सिस्टीम क्र. 209 मध्ये सेक्युरिटी गार्ड विलास आबासाहेब राठोड (वय 32वर्षे रा. गंगारामवाडी ता. अंबड जि. जालना ह.मु. संजयनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद) यांनी मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील यांच्या सूचना प्रमाणे सकाळी 08.30 वा. सुमारास हॉलमध्ये जाऊन परिक्षार्थी यांची अंगझडती घेतली.

यावेळी एक परिक्षार्थी संशईतरित्या हालचाल करीत असल्याचे आढळून आल्याने त्याची बारकाईने झडती घेतली. त्याच्याजवळ एक ATM ट्रान्समीटर ज्यामध्ये VI कंपनीचे सिम, ब्लुटुथ डिव्हाईस, MicSpy कंपनीचे काळ्या व पिवळ्या रंगाचे मख्खी एअर फोन, सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट आदी साहित्य आढळून आले.

सदर परीक्षार्थीचे हॉलतिकीट बारकाईने चेक केले असता, हॉल तिकीटवरील फोटो आणी सदरच्या व्यक्तीचा चेहरा पट्टी वेगवेगळी दिसली. परीक्षार्थीची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अविनाश सजन गोमलाडु (वय 21 वर्षे रा. शिवगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद) असे सांगितले. मित्र विकास शाहूबा शेळके (वय 23 वर्षे रा. टाकळी पो. मोहरा ता कन्नड जि. औरंगाबाद) याच्या जागेवर तो परीक्षा देत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सदर परिक्षार्थीस त्याचेजवळ असलेल्या साहित्यासह ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले.

याप्रकरणी आय ऑन डिडिटल झोन येथील डिव्हिजनल मॅनेजर वैभव पांडुरंग पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून  अविनाश सजन गोमलाडु (वय 21 वर्षे रा. शिवगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद) व विकास शाहूबा शेळके (वय 23 वर्षे रा. टाकळी पो. मोहरा ता कन्नड जि. औरंगाबाद) यांच्यावर एमआईडीसी सिडको पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० कलम ३४, ४९९, ४२० व महाराष्ट्र विद्यापिठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणार्या गैर प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!