छत्रपती संभाजीनगर
Trending

वनविभागाच्या वनरक्षक परीक्षेत धक्कादायक बाब समोर: प्रश्नपत्रीकेतील उत्तरांची कॉपी पुरवण्यासाठी सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाखांचा कोरा चेक घेतला ! छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅकेटचा पर्दाफाश, परीक्षार्थींची दहावी व बारावीची कागदपत्रे जप्त !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- वनविभागाच्या वनरक्षक परीक्षेत उत्तरांची कॉपी पुरवण्यासाठी सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाखांचा कोरा चेक घेतल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सिडको परिसरात छापा टाकून एका कारमधून कॉपी पुरवणारे आरोपी व परिक्षार्थीचे प्रत्येकी १० लाखांचे कोरे चेक जप्त केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरे चेक, दहावी व बारावीची कागदपत्रे मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली असून वनविभागाच्या या भरतीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

1) अमोल धनराज निचड वय 30 वर्ष, व्यवसाय – शिक्षण, रा.मु.पो. रवंदाळा, ता. आकोट जि.अकोला, 2) आण्णाजी धनाजी काकडे वय 29 वर्ष व्यवसाय – संत बाळुमामा ऍकडमी संचालक, रा. मुक्काम पिंपळवाडी, पोस्ट वडुज, ता. खटाव, जि.सातारा. 3) अनिल भरत कांबळे, रा. जिल्हा सातारा 4) संदिप भुतेकर रा. छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देविदास नामदेव काळे (पोअं, MIDC – सिडको, छत्रपती संभाजीनगर शहर) यांनी दिलेली माहिती अशी की, ते पोलिस स्टेशनच्या विशेष पथकात काम करतात. आज, दि. 04/08/20123 रोजी सकाळी 09.00 ते 21.00 वाजेपर्यंत दिवसपाळी कर्तव्यावर हजर असतांना पोनि यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, API कॉर्नर येथे फोर्ड कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात काही जण बसून हे आज दि. 04/08/2023 रोजी होणाऱ्या वनरक्षक भरतीच्या उमेदवाराला उत्तरे पुरवणार आहेत. तसेच त्यांच्याजवळ काही उमेदवारांचे मुळ शैक्षणिक कागदपत्रे आहेत. ही खात्रीलायक माहीती मिळाल्यावरुन पोनि स्वतः व त्यांच्या आदेशाने दुपारी 12.00 वाजेच्या सुमारास पोउपनि पंकज मोरे (पोस्टे मुकंदवाडी), पोउपनि घुगे, पोउपनि राऊत, पोस्टे एम सिडको, पोअं सोनवणे, पोअं गायकवाड दोन शासकीय वाहनाने दोन पंच व जप्ती पंचनामासाठी लागणारे साहित्यासह रवाना झाले.

त्यानंतर API कॉर्नर, एन-1, सिडको छत्रपती संभाजीनगर येथे गेल्यावर पोलिसांना सदर API कॉर्नरकडून सिडको बसस्थानक कडे जाणा-या सर्विस रोडच्या उजव्या बाजुला एक फोर्ड कंपनी पांढ-या रंगाची चारचाकी वाहन (क्रमांक MH-12-LD 4754) उभे दिसले. त्यानंतर पोनि यांनी पोलिस पथकाला इशारा केला असता पोलिस पथकाने सदर गाडीस घेराव घातला. त्यानंतर पोनि यांनी व सर्व पोलिस स्टाफने सदर गाडीचे दोन्ही पाठीमागील दरवाजे उघडले. त्यावेळी सदर गाडीत दोन जण पुढच्या सीटवर बसलेले दिसले. त्यांना ताब्यात घेउन त्यांची नावे व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) अमोल धनराज निचड (वय 30 वर्ष, व्यवसाय शिक्षण, रा.मुपो रवंदाळा, ता. आकोट जि. अकोला) 2)आण्णाजी धनाजी काकडे वय 29 वर्ष व्यवसाय संत बाळुमामा ऍकडमी संचालक, रा. मुक्काम पिंपळवाडी, पोस्ट बडुज, ता. खटाव जि.सातारा असे सांगितले. त्यांना येथे येण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले.

त्यामुळे पोलिसांनी पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता वाहनात 1) साबांरे योगेश चांगदेव याची 10 वी सनद मार्कशिट 12 वी चे मार्कशिट व JK बँकेचा सही केलेला कोरा चेक मिळून आला 2) प्रविण बाळासाहेब घुले यांची 10 वी सनद, मार्कशिट 12 वी चे मार्कशिट व SBI बँकेचे सही केलेले दोन कोरे चेक मिळुन आले 3) विक्रम किसन भांडगे याचे 10 वी सनद, मार्कशिट 12 वी चे मार्कशिट डोमीसाईल प्रमाणपत्र, कास्ट प्रमाणपत्र, कास्ट प्रमाणपत्र पार्ट 4 ) शुभम दिवटे याचे SBI बँकेचे सही केलेले: दोन चेक त्यापैकी चेक हा संदिप भुतेकर याच्या नावाने रुपये 5,00,000/- व दुसरा चैक हा अमोल धनराज निचड याच्या नावाने 5,00,000/- रुपयेचा नावे असलेला. 5) विटकर संजय देविदास याचे 10 वी सनद, मार्कशिट 12 वी चे मार्कशिट सनद, कास्ट प्रमाणपत्र 6) गणेश संतोष मांडे याचे युनियन बँकेचे सही केलेले दोन चेक त्यापैकी एक 5,00,000/- रुपयाचा अमोल धनराज निचड याचे नाव असलेला व दुसरा चेक 5,00,000/- रुपयाचा अन्नाजी धनाजी काकडे याचे नावे असलेला तसेच डोमीसाईल व नॅशनॅलीटी प्रमाणपत्र असे कागदपत्रे मिळून आले.

याशिवाय मोबाईल व एक फोर्ड कंपनी पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन मिळून आले. वाहनात मिळालेल्या कागदपत्राबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही वनरक्षक भरतीच्या उमेदवाराला उत्तरे पुरवुन त्यांच्याकडून प्रत्येकी 10,00,000/- रुपये घेणार आहे. त्यामुळे त्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे व बँकेचे सही केलेले चेक आमच्याकडे ठेवलेले आहेत. तसेच त्यांना त्यांच्या इतर साथीदाराबाबत माहीती विचारली असता त्यांनी त्यांचे साथीदार अनिल भरत कांबळे, रा. जिल्हा सातारा व संदिप भुतेकर रा. छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. तसेच सदर व्यक्ती हे कोठे आहे याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ते दोघेही रवीराज लॉज, बाबा पेट्रोलपंप छत्रपती संभाजीनगर येथे थांबलेले आहे असे सांगून त्यांच्याकडे असलेल्या इनोव्हा कारमध्ये इतर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे असल्याचे सांगितले.

तसेच नमुद आरोपीचे मोबाईलमध्ये आज रोजी परीक्षा असलेले 1 योगेश चांगदेव सांबारे 2. अंकुश नामदेव मालकर 3. सतीश कुंडलिक ढाणे यांचे छत्रपती संभाजीनगर येथील वेगवेगळ्या परीक्षा सेंटर वरील परीक्षार्थी यांचे वनरक्षक भरतीचे हॉल तिकीट आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कागदपत्रे, मोबाईल व गाडी जप्त केली. 1) अमोल धनराज निचड वय 30 वर्ष, व्यवसाय – शिक्षण, रा.मु.पो. रवंदाळा, ता. आकोट जि.अकोला, 2) आण्णाजी धनाजी काकडे वय 29 वर्ष व्यवसाय – संत बाळुमामा ऍकडमी संचालक, रा. मुक्काम पिंपळवाडी, पोस्ट वडुज, ता. खटाव, जि.सातारा. 3) अनिल भरत कांबळे, रा. जिल्हा सातारा 4) संदिप भुतेकर रा. छत्रपती संभाजीनगर यांनी संगनमत करून परीक्षार्थी यांना वनरक्षक पदाची शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 10,00,000/- रुपये घेण्याचे ठरवून परीक्षार्थी यांची मुळ कागदपत्रे ताब्यात घेवून सदर परीक्षेत गैरप्रकार करण्याचा कट रचून परीक्षार्थी व शासनाची फसवणुक करताना मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!