छत्रपती संभाजीनगर
Trending

ग्रामसेवकाची कॉलर पकडून चापटबुक्क्याने मारहाण ! भिंदोन गावातील स्वच्छता अभियानात खोडा, एकावर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात एका व्यक्तीने खोडा घालून ग्रामसेवकाची कॉलर पकडून चापट बुक्क्याने मारहाण केल्याची फिर्याद ग्रामसेवकाने दिली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भिंदोन गावात हा प्रकार घडला.

बाबासाहेब एकनाथ शिंदे (रा. भिंदोन) असे आरोपीचे नाव आहे. निवृती शिवराम उदे (वय 39 वर्षे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत भिंदोन रा. इटखेडा परिसर पैठण रोड छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, 01/10/2023 एक तास सामूदायिक श्रमदान स्वच्छता मोहीमेसंदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश होते.

या आदेशानुसार सकाळी 10.00 वाजेपासून ग्रामपंचायत भिंदोन गावचे उपसरपंच विठ्ठल रामराव शिंदे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड, उध्दव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ ग्रामपंचायत व गावातील परिसरात स्वच्छता अभियान राबवत होते. एक तारीख एक तास सामूदायिक श्रमदान स्वच्छता मोहीम सुरु असताना गावतील बाबासाहेब एकनाथ शिंदे (रा. भिंदोन) हे तेथे आले ग्रामसेवक निवृती उदे यांना म्हणाले की, तू फार शहाणा झालास का ? तू फार गाव स्वच्छ करायला निघालास. त्यास ग्रामसेवक निवृती उदे समजावून सांगितले की, आज शासनातर्फे एक तारीख एक तास स्वच्छता अभियान मोहीम असल्याने आम्ही ग्रामपंचायत कार्यालय परिसर, शाळा तसेच गावातील परिसर स्वच्छ करीत आहोत.

तेव्हा बाबासाहेब शिंदे हे शिवीगाळ करु लागले. त्यास उपसरपंच विठ्ठल शिंदे यांनी तू इथून निघून जा असे समजावुन सांगत असताना ते म्हणाला की, तुम्ही फार स्वच्छता करणारे झाले. मी आमच्या गावाचे स्वच्छतेचे पाहून घेतो. त्यावर ग्रामसेवक निवृती उदे व ग्रामस्थांनी त्याच्याकडे लक्ष न देता स्वच्छतेचे काम सुरु केले. त्यावर बाबासाहेब यांनी ग्रामसेवक निवृती उदे यांच्या शर्टची कॉलर धरून चापटबुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली.

तेव्हा तेथे असलेल्या ग्रामस्थांनी त्यास धरून बाजुला केले तसेच त्यास सदर ठिकाणहून निघून जाण्याची विनंती केली परंतु बाबासाहेब शिंदे हा तेथून निघून न जाता शिवीगाळ करु लागला. स्वच्छतेचे काम बंद करून मोठमोठ्याने शिवीगाळ करून म्हणाला की, तु इथे कसा काम करतो व कसा नोकरी करतो ते मी पहातो असे म्हणून जिवे मारण्याच्या धमक्या देवून ग्रामसेवक निवृती उदे यांच्या अंगावर धावून येत होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी निवृती शिवराम उदे (वय 39 वर्षे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत भिंदोन रा. इटखेडा परिसर पैठण रोड छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब एकनाथ शिंदे (रा. भिंदोन) यांच्यावर चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!