महाराष्ट्र
Trending

जिल्हा उपनिबंधक व वकील ३० लाखांच्या लाचेच्या सापळ्यात अडकले ! कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या सुनावणीचा निकाल बाजुने लावण्यासाठी घेतली लाच !!

नाशिक, दि. १६ – जिल्हा उपनिबंधकाला ३० लाखांची लाच घेताना पकडण्यात आले. यासाठी वकीलाने तक्रारदारावर प्रभाव टाकल्याचा आरोप आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या सुनावणीचा निकाल आपल्या बाजुने लावण्यासाठी लाच घेतली.

१) सतीश भाऊराव खरे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, २) अॅड. शैलेष सुमतीलाल साभद्रा, व्यवसाय- वकील, रा. प्लॅट नं ४, उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापुर रोड, नाशिक अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, दिंडोरी या पदाचे निवडीविरुध्द दाखल याचिकेची सुनावणीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजुने देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (सहकारी संस्था, नाशिक) यांनी ३०,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली.

तसेच ॲड. शैलेष सुमतीलाल साभद्रा (वकील, रा. गंगापुर रोड) यांनी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या ओळखीचा तक्रारदार यांचेवर प्रभाव टाकून खरे यांचे करीता ३०,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून ला. प्र. वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (सहकारी संस्था, नाशिक) यांनी ३०,००,००० /- रूपये लाचेची मागणी केली तसेच अॅड. शैलेष सुमतीलाल साभद्रा (वकील, रा. गंगापुर रोड) यांनी खरे यांचे ओळखीचा तक्रारदार यांचेवर प्रभाव टाकून खरे यांचे करीता ३०,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली.

सदर लाचेची रक्कम खरे यांनी दि. १५.०५.२०२३ रोजी स्वतःचे प्लॅाटमध्ये स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले. दोघांविरूध्द गंगापूर पोलीस ठाणे, नाशिक शहर गुरनं. १२३/२०२३, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७,७ अ प्रमाणे दि. १६.५.२०२३ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!