छत्रपती संभाजीनगरदेश\विदेश
Trending

कुलगुरु निवड समितीवर डॉ.सुधाकर एडला यांचे नामांकन ! कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना निवडीचे सर्वाधिकार !!

व्यवस्थापन, विद्यापरिषदेची बैठक

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आगामी कुलगुरू निवड समितीवर श्रीनगर येथील ‘एनआयटी’चे संचालक डॉ.सुधाकर एडला यांचे नामांकन करण्यात आले आहे. व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या संयुक्त बैठकीत कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना सदस्य निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची नव्याने गठीत विद्यापरिषद व व्यवस्थापन परिषदेची संयुक्त बैठक कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली. महात्मा फुले सभागृहात झालेल्या या बैठकीस प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, सर्व अधिष्ठाता, दोन्ही सभागृहाचे ५६ सदस्य उपस्थित होते. विद्यमान कुलगुरु मा.डॉ. प्रमोद येवले यांची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ११ (३) (क) अंतर्गत तरतुदीनुसार कुलगुरू शोध समितीवर सदस्याचे नामनिर्देशन करण्यात य या संदर्भात राजभवनच्या वतीने ८ मे रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार ही निवड करण्यासाठी ही संयुक्त बैठक घेण्यात आली.

या बैठकीत राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेतील संचालकांचे सदस्य म्हणून नामांकन करण्याचा एकमेव ठराव मांडण्यात आला. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम यांनी सदर सदस्य निवडीचे अधिकार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना देण्याचा ठराव मांडला. कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ. राजेश करपे वडॉ. व्यंकटेश लांब यांनी ठरावास अनुमोदन दिले.

यावेळी कुलगुरु मा.डॉ. प्रमोद येवले यांनी जम्मू- काश्मिरमधील श्रीनगरच्या ‘एनआयटी’चे संचालक डॉ.सुधाकर एडला यांचे नामांकन सुचविले . सर्व सदस्यांनी एकमताने ते मंजूर केले. सर्वानुमते एकाच सदस्याचे नामांकन ठरविण्याचा पायंडा पाडला याबद्दल सर्व सदस्यांचे कुलगुरु डॉ. येवले यांनी अभिनंदन केले.

डॉ.एडला यांचा अल्प परिचय- जम्मू – काश्मिरमधील श्रीनगर येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ.सुधाकर एडला हे तीन दशकांपासून अध्यापन, संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. आंधप्रदेशातील द्रविडीयिन विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक एनआयटी (वारंगल) या पदावंर कार्य केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!