महाराष्ट्र
Trending

पोटच्या पोराने डोक्यात वार करून केला बापाचा खून, माजलगाव तालुक्यातील दिंद्रुडच्या यश इन्टरनॅशनल शाळेजवळील घटना ! मृतदेह दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीत फेकून गंगाखेड परळी मार्गे पसार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – दारूचे व्यसन असल्याचा राग अनावर झाल्याने पोटच्या मुलाने बापाच्या डोक्यात लाकडाचे दोन तीन वार करून खून केल्याची घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिद्रुड गावातील यश इन्टरनॅशनल शाळेजवळ घडली. वडील मृत झाल्याचे लक्षात येताच त्यांचा मृतदेह स्वीफ्ट कारमध्ये टाकून पाथरी पोखर्णी मार्गे आणून दैठणा गावाजवळील पुलावरून इंद्रायनी नदीत फेकून आरोपी गंगाखेड परळी मार्गे निघून गेला. दरम्यान, नदीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढून खूनाचा उलगडा केला.

मुंजा एकनाथ कटारे (वय 52 वर्षे, रा. दिद्रुड ता. माजलगाव जि. बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून अशोक मुंजा कटारे (वय 24 वर्षे रा. दिद्रुड ता. माजलगाव जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे.

पोउपनि संजय अभिमन्यु वळसे (नेमणुक पोलीस स्टेशन दैठणा, ता. जि. परभणी) यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 16/09/2023 रोजी पो.स्टे. दैठणा येथे कर्तव्यावर हजर असताना पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती मिळाली की, दैठणा गावाजवळील इंद्रायनी नदीच्या पुलाखाली अनोळखी मृतदेह आहे. सदर घटनेची माहिती घेणे करीता पो.स्टे.स्टे.डा. नोंद करून पोउपनि संजय वळसे व सोबत सपोउपनि बि.एस. मुंढे शासकीय वाहनाने रवाना झाले.

दैठणा ते गंगाखेड महामार्ग रोडवरील इंद्रायणी नदीच्या पुलावर जावून पाहणी केली असता इंद्रायणी नदीच्या पुलाचे खाली 30 ते 35 फुट खोल अंतरावर पाण्यात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. पोउपनि संजय वळसे यांनी ही माहिती ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि बंदखडके यांना दिली. त्यानंतर सपोनि बंदखडके स्टॉफसह सदर ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी अनोळखी मतदेह पाण्याबाहेर काढण्याकरीता क्रेन, अॅम्बुलन्स व एम.एस.सी. इ.बी कर्मचारी बोलावून फोकस लावून लाईटची सुविधा करून तसेच वैदयकीय अधिकारी वाजीद तसेच अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे,  एस.डी.पि.ओ शिरतोडे आले. सदर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेवून सुध्दा रात्र झाल्याने मृतदेह पाण्याबाहेर काडण्यात यश आले नाही.

पाण्यात तरंगणारा मृतदेह डिकम्पोज स्थितीत दिसून येत असल्याने वैदयकीय अधिकारी यांनी सदर मृतदेहावर सूर्य प्रकाशाच्या उजेडात पि.एम. करावे लागेल असे सांगितल्याने सदर अनोळखी मृतदेहाच्या निगराणी करीता पोह लोखंडे, पोह पडोळे यांना नेमण्यात आले. दिनांक 17/09/2023 रोजी सकाळी 8.56 वाजता सपोनि बंदखडके पोलिस पथकासह इंद्रायणी नदीच्या पाण्यात तरंगणारे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह क्रेनच्या साहयाने पाण्याच्या बाहेर काढला. मृतदेहाची पाहणी दोन शासकीय पंचासमक्ष केली असता अंगात एक लाल रंगाची पाढ-या पटया असलेला व नाडा असलेली चड्डी व चेह-यावर व डोक्याला प्लॅस्टिकची पन्नी बांधलेली असून गळयावर पांढ-या रंगाचा रुमाल आवळून बांधलेला दिसुन आला.

मृतदेहाच्या उजव्या हातावर इंग्रजीत मुंजा एकनाथ कटारे व ओम गोंदलेले दिसून आले. पोलिसांनी दोन पंचासमक्ष चेह-यावर व डोक्याला बाधलेली प्लॅस्टिकची पन्नी सोडून चेहर्याची व डोक्याची पाहणी केली असता मानेवर गोलाकार व्रण दिसून आला. डोक्यास डाव्या बाजुस जखम असल्याची दिसून आली.  मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. दरम्यान, सदर घटनास्थळी पोलिसांनी सोशल मीडियावर मृताचे पाठविलेले फोटो व वर्णणाच्या अनुशंगाने वेगवेगळया पो.स्टे.ला मिसींग दाखल असलेले खबर देणार फिर्यादी सदर ठिकाणी मृतदेहाची पाहणी करणे करीता मौजे वझुर तसेच बोरी येथील निवृत्ती राजाराम क-हाळे तसेच दिदुड ता. माजलगाव जि. बीड येथील उषा मुंजाभाऊ कटारे मृतदेहाची पाहणी करण्यासाठी आले.

उषा मुंजाभाऊ कटारे यांनी मृतदेहाची ओळख पटून सदर अनोळखी मृतदेह हा उषा कटारे यांचे पती मुंजा एकनाथ कटारे (वय 52 वर्षे) यांचा असल्याचे ओळखले. सदर मृतदेह ओळखारे यांच्या समक्ष सदर घटनास्थळीच दोन पंचासमक्ष पंचनामा तसेच घटनास्थळ पंचनामा करण्यात आला व मृतदेहाची ओळख पटल्याने पि.एम. कार्यवाही करणे करीता सरकारी दवाखाना परभणी येथे नेण्यात आले. मृतावर सरकारी दवाखाना परभणी येथे पि.एम. कार्यवाही केली. वैदयकीय अधिकारी वाजीद अली यांनी रिपोर्ट दिला.

मृतदेह अत्यविधी करीता मृताची पत्नी उषा कटारे यांच्या ताब्यात दिला. त्यावेळी तेथे मृताचा मुलगा अशोक मुंजा कटारे (वय 24 वर्षे रा. दिद्रुड ता. माजलगाव जि. बीड) यांच्याकडे सदर मृताच्या मृत्युच्या अनुशंगाने विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्याच्याकडे सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याने सांगितले की, मृत मंदुजा एकनाथ कटारे हे माझे वडील असून ते दारुचे वेसनी असल्याने ते नेहमी मला त्रास देत असल्याने दिनांक 12/09/2023 रोजी रात्री 10.00 वाजता सुमारास दिद्रुड गावातील यश इन्टरनॅशनल शाळेजवळ वडील दारुच्या नशेत होते.

त्यावेळी मुलगा अशोक कटारेने रागाच्या भरात वडीलांच्या डोक्यात लाकडाने दोन तीन वार केले. यात ते जखमी झाल्याने बेशुध्द होवून त्यांच्या डोक्यातून रक्त निघू लागले. ते कोणतीही हालचाल करत नसल्याने मयत झाल्याचे समजल्याने त्यांच्या डोक्यातील रक्त सांडु नये म्हणून अशोकने वडीलांच्या अंगावरील कपडे काढून घेवुन वडीलाच्या चेह-यावर व डोक्याला दोन प्लॅस्टिकच्या पन्या बांधून गळयाला पांढरे रुमाल घट्ट बांधला. वडील मयत झाल्याने अशोकने स्वतःच्या स्वीफ्ट कारमध्ये वडिलाच्या मृतदेहाला टाकून कार पाथरी पोखर्णी मार्गे आणून दैठणा गावाजवळील नदीच्या पुलाजवळ लोकांची रहदारी नसल्याने नदीच्या पाण्यात रात्री अंदाजे 01.00 वाजेच्या सुमारास टाकूण तेथून गंगाखेड परळी मार्गे अशोक निघुन गेला.

Back to top button
error: Content is protected !!