महानगरपालिका
Trending

जालन्यातील कामचुकार १४ कृषी सहाय्यकांवर गुन्हे दाखल, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ ! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या एक्सेल शिटमध्ये सादर न केल्याने प्रकरण पेटले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- जालन्यातील कामचुकार १४ कृषी सहाय्यकांवर गुन्हे दाखल केल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या एक्सेल शिटमध्ये सादर न केल्याने तहसिलदार यांनी बजावलेल्या नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्याने तहसिलदारांनी या १४ कृषी सहाय्यकांविरोधात फिर्याद दिली आहे. या १४ कृषी सहाय्यकांच्या कामचुकार वृत्तीमुळे शेतकरी वेळेवर मदतीपासून वंचित राहिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

1) एम.एस. घोरपडे कृषी सहाय्यक, हिस्वन बुद्रुक,
2) ए.एन. सोनवलकर कृषी सहाय्यक, चितळीपूतळी
3) व्हि.के. पुंड कृषी सहाय्यक, रेवगांव
4) जी.एल. ढवळे कृषी सहाय्यक, वाडी व ममदाबाद
5) एस. एस. काकडे कृषी सहाय्यक, नागापूर
6) जे. के. तायडे कृषी सहाय्यक, उमरी
7) बी.जे. कदम कृषी सहाय्यक, पळसखेडा
8) एन.जी. राठोड कृषी सहाय्यक, कवठा
9) बी. एल. वाघ कृषी सहाय्यक, आंबेडकरवाडी
10) यु.बी. बंगाळे कृषी सहाय्यक, माळेगांव खूर्द
11) यु.डी. खांडेभराड कृषी सहाय्यक, थार
12) जी. ए. अंभोरे कृषी सहाय्यक, खणेपुरी
13) व्ही. आर. कुलकर्णी कृषी सहाय्यक, तांदुळवाडी बुद्रुक
14) एस. के. भुतेकर कृषी सहाय्यक, रायगव्हाण, ता. जालना अशी गुन्हा दाखल झालेल्या कृषी सहाय्यकांची नावे आहेत.

जालन्याचे नायब तहसिलदार दिलीप शेनफड सोनवणे (रा. शासकीय निवासस्थान ओमनगरजालना) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक 25.08.2023 नुसार सन 2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टिच्या निकषाबाहेरी (सततपाऊस) शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या अद्यावत याद्या एक्सेल शिट सादर करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यां विरोधात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तहसिलदार दिलीप सोनवणे यांना प्राधिकृत केले आहे. त्यानुसार त्यांनी फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत नमूद केले आहे की, सन 2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टिच्या निकषा बाहेरील सततच्या पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकरी यांना वाढीव दराने अनुदान वितरीत करण्यासाठी दिनाक 20 जुन 2023 रोजी शासन निर्णय प्राप्त झाला होता. या शासन निर्णया अन्वये शासना कडून सूचना प्राप्त झाल्या. त्या नुषंगाने शासनाचे पोर्टल वर बाधीत शेतकरी यांची माहिती Upload करण्यासाठी विहीत नमुन्यात माहिती (आधार क्रमांक व खाते क्रमांक) गोळा करण्यात येऊन बाधीत शेतकऱ्यांच्या याद्या सादर करण्यासाठी यापूर्वीच या कार्यालयाच्या आदेशान्वये कळवण्यात आलेले आहे तसेच सदर अनुदान चालु आर्थिक वर्ष 20023 2024 समाप्त होण्या पूर्वी संबंधित खातेदारांच्या खात्यावर वर्ग होण्याच्या अनुषंगाने सदर कामकाज वेळेत पूर्ण करण्या बाबत जिल्हाधिकारी यांचे स्पष्ट निर्देश आहेत.

त्यानुषंगाने या कार्यालयातील बैठक दि. 23.06.20123 व दि. 20.7.2023 रोजी नैसर्गिक आपत्ती बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच दि. 26/07/2023 रोजी शिट दाखल न केल्याने या कार्यालयातर्फे नोटीस देण्यात आली असताना दि.31/07/2023 रोजी नमुद कृषी सहाय्यक यांनी खुलासा सादर केला जो असमाधान कारक आहे. खुलाशाच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक यांना यादी तयार करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांना आवश्यक ते संगणक साहित्य पुरविण्यात बाबत कळविण्यात आले तसेच तलाठी यांच्या कडील लॉपटॉप पुरविण्यात येतील तसेच आवश्यकता भासल्यास तहसिल कार्यालयातील संगणक उपलब्ध असून कृषी सहाय्यक यांनी विहीत नमुण्यातील याद्या तयार करण्यासाठी त्यांचा वापर करावा असे सूचवून देखील कृषी सहय्यक यांनी याद्या दाखल न केल्याने दि. 09/08/2023रोजी नोटीस बजावून अतिवृष्टिच्या निकषाबाहेरील पावसामुळे बाधित शेतक-यांची माहिती पोर्टलवार अपलोड करण्यासाठी विलंब होत असलयाने आपणा विरुध्द नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) 1979 अन्वये शिस्त भंगविषयक कार्यवाही प्रस्तावित का करण्यात येवू नये याबाबतचा लेखी खुलासा, यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस मिळताच पुरावादर्शक कागदपत्रांसह 24 तासाच्या आत सादर करण्याचे बाजावले होते.

विहीत कालावधीत आपला लेखी खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा खुलासा समाधान कारक नसल्यास, आपणा विरुध्द नियमा नूसार शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. अशी ताकीद दिली असतांना देखील दिनांक 25/08/2002 रोजी पर्यंत 15 गावांच्या 14 कृषी सहाय्यक यांनी सन 2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टिच्या निकषा बाहेरील सततच्या पावसामुळे झालेलया शेती पिकांच्या नुकसानी करिता शेतक-यांना देय अनुदान याद्या विहीत नमुन्यात सादर केल्या नाही. यामळे शासनाच्या पोर्टलवर 15 गावांच्या याद्या अपलोड करता आल्या नाही. यामुळे शेतक-यां मध्ये लोकप्रतिनी मध्ये प्रशासना बद्दल रोष निर्माण होऊन शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे.

सदरील नेमून दिलेली कामे निर्धारित वेळेवर करणे आवश्यक असल्यामुळे त्यांना नेमून दिलेले काम करण्यास संबधीत कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या कामा मध्ये जाणीव पूर्वक टाळाटाळ केल्यामुळे ते आपती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 56 व 57 नुसार शिक्षेस पात्र ठरत असल्याने मला तहसिलदार जालना यांनी त्यांचे वतीने गुन्हा दाखल करण्या साठी प्राधीकृत केल्याने  15 गावांच्या 14 कृषी सहाय्यक यांच्या विरुध्द फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून जालना तालुक्यातील १४ कृषी सहाय्यकांवर तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!