छत्रपती संभाजीनगर
Trending

दारू पिण्यास टेबल लावला नाही म्हणून रात्री साडेअकरा वाजता बारमध्ये राडा ! आकाशवाणी परिसरातील पंचम बारमध्ये ५ जण घुसले, वेटरवर चाकुहल्ला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – रात्री उशीरा हॉटेलमध्ये घुसून दारू पिण्यास टेबल का लावले नाही म्हणून ५ जणांनी राडा घातला. मोठमोठ्याने कांऊटर वाजवून ५ जणांनी वेटरवर हल्ला चढवला. चाकु हल्ल्यात वेटर जखमी झाल्याची घटना रात्री उशीर घडली. छत्रपती संभाजीनगर शहर जालना रोडवरील आकाशवाणी परिसरातील पंचम बारमध्ये हा राडा झाला.

संकेत विनायकराव जगताप असे जखमी वेटरचे नाव आहे. 1) अय्युब अली उर्फ बाली महेबुब शेख (रा. दाद कॉलनी, छत्रपती संभाजीनगर), 2) अय्युब बालीचा मोठा मुलगा व इतर तीन अनोळखी अशी आरोपींची नावे आहेत.

नितीन भगवान कांबळे (वय 34 वर्षे धंदा पंचम हॉटेल येथे वेटर, रा. साई आर्केड, सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि 05/07/2023 रोजी संध्याकाळी 04.00 वाजता हॉटेल पंचम बार (आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर) येथे नियमितपणे कामावर होता. त्यावेळी नितीन भगवान कांबळे यांच्या सोबत काम करणारे नऊ वेटर कामावर होते.दरम्यान रात्री 23.00 वाजेच्या सुमारास हॉटेलच्या समोरील शटर व दरवाजा बंद करून आतमध्ये हिशोब व साफसफाईचे काम चालु असताना सुमारे 23.30 वाजेच्या सुमारास शटरच्या बाजुच्या लोखंडी दरवाज्यामधून पाच ते सहा जण हे आतमध्ये आले.

नितीन भगवान कांबळे यास ते म्हणाले की हमें दारू पीनी है हमे टेबल लगाओ. यावर नितीन कांबळे त्यांना म्हणाला की, अभी 11.30 हो गए हमने बार किचन बंद कर दिया है असे सांगितले. यावरुन 1 ) अय्युब अली उर्फ बाली महेबुब शेख 2 ) अय्युब बालीचा मोठा मुलगा व इतर तीन अनोळखी हे काऊंटरवर येवून जोरजोरात टेबल हाताने वाजवू लागले. तेव्हा आय्युब शेख ओरडत म्हणाला की, अब तेरे को जिंदा छोडूंगा नही जान से मार दूंगा. मुझे पहचानता नहीं क्या ? मैं इधर का दादा हू. हमे दारू दे. त्यावेळेस हॉटेलमध्ये वेटरचे काम करणार्या वेटर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.

त्यावेळी संकेत विनायकराव जगताप यास आय्युब अली उर्फ बाली याने त्याच्या कंबरेला लपवून ठेवलेल्या चाकूने व अनोळखी इसमापैकी एकाने त्याच्या जवळील चाकुने संकेतवर जिव घेणा हल्ला केला. हल्यामध्ये संकेतला चाकुने मारून गंभीर जखमी केले. त्यावेळेस दोन अनोळखी आरोपीनी व अय्युब शेख याच्या मुलाने यांनी सुद्धा संकेतला मारहाण केली. हॉटेलमध्ये काम करणा-या अन्य वेटरवर मारण्यासाठी धावून गेले. झटापटीमध्ये नितीन कांबळे सोबत असलेल्या कामगाराना किरकोळ जखमा झाल्या आहेत. थोड्या वेळानंतर ते हॉटेलच्या बाहेर निघून गेले. दरम्यान, संकेत जगताप यास कर्मचा-याच्या मदतीने औषधोपचारकामी घाटीत दाखल केले. सध्या संकेतवर उपचार चालु आहेत.

याप्रकरणी नितीन भगवान कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी मगरे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!