छत्रपती संभाजीनगर
Trending

सोळा वर्षांची पोरंही तलवार नाचवून दहशत पसरवू लागली ! छत्रपती संभाजीनगरात चाललंय तरी काय ?

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – सोळा वर्षांची पोरंही आता तलवारी नाचवून दहशत पसरवू लागली आहेत. एकाच गल्लीतील दोन मुले रस्त्याच्या मधोमध दहशत पसरवित होते. ही माहिती मिळताच जिन्सी पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी १६ वर्षांच्या मुलाच्या ताब्यातून तलवार जप्त केली. खब-याकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

पोअं सर्जेराव शंकपाळ (पो.स्टे. जिन्सी छत्रपती संभाजीनगर) यांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार दि. 17/06/2023 रोजी पोअं सर्जेराव शंकपाळ व सोबत पोह शेख जफर, पोअ संतोष बमनात जिन्सी हद्दीमध्ये खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत होते. त्याचवेळी 18:30 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संजयनगर गल्ली नं C7 छत्रपती संभाजीनगर येथे दोन मुले विनापरवाना बेकायदेशिर रित्या तलवार हातात घेवून दहशत निर्माण करीत आहे.

ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिस पथक खाजगी वाहनाने संजयनगर गल्ली नं C7 येथे 18.50 वाजेच्या सुमारास पोहोचले. तेथे दोन मुले है सार्वजनिक गल्लीत रस्त्याच्या मधोमध हातात तलवार घेवून दहशत निर्माण करीत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या मुलांना ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे सांगितली.

दोन्ही मुले १६ वर्षांची असून ते शिक्षण घेतात. दोघेही संजयनगर गल्ली नं C7 मध्ये राहतात. पोलिसांनी त्यांना तलवारी बाबत व तलवारीच्या परवान्याबाबत विचारले असता त्यांनी कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोह शेख जफर यांनी त्यांचेकडे मिळून आलेली तलवार दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून जप्त केली.

Back to top button
error: Content is protected !!