छत्रपती संभाजीनगर
Trending

महावितरणच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन !

महावितरणच्या वर्धापनदिनानि‍मित्त विविध कार्यक्रम

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ : महावितरणचा 18 वा वर्धापनदिन 6 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गतवर्षीपासून राज्यभर मंडल स्तरावर महावितरणचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. यंदाही छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 व 6 जून रोजी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. 5 जून रोजी महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने बसस्थानक व क्रांती चौक परिसरात अनुक्रमे सकाळी साडेआठ व साडेनऊ वाजता ऊर्जा विषयावरील पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

6 जून रोजी सकाळी 7 वाजता महावितरणचे मिलकॉर्नर येथील प्रशासकीय कार्यालय ते सूतगिरणी उपकेंद्र या मार्गावर महावितरणच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथासह मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीच्या समारोपानंतर सूतगिरणी उपकेंद्रात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

सायंकाळी 5 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले उपस्थित राहतील, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ,मुरहरी केळे राहतील.

यावेळी महिलांसाठी विविध ख्रेळ व स्पर्धा, रवींद्र कोकरे यांचे कथाकथन, संदीप पाचंगे यांचा ‘चुकीला माफी नाही’ हा एकपात्री प्रयोग तसेच दिलीप खंडेराय व संचाच्या वतीने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येईल. कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरणही याप्रसंगी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, स्थापत्य मंडलाचे अधीक्षक अभियंता मोहन काळोगे, शहर मंडलाचे प्रभारी अधीक्षक अभियंता सतीश खाकसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!