छत्रपती संभाजीनगर
Trending

म्‍हाडांच्या घरांची उद्या संगणकीय सोडत; 936 सदानिका, भूखंड, गाळ्याकरीता 2225 अर्जदार इच्छूक !!

संभाजीनगर लाईव्ह, दिनांक 26 : औरंगाबाद गृहनिर्माण मंडळामार्फत 936 सदानिका, भूखंड, गाळ्याकरीता विविध वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आलेली होती. जाहिराती अन्वये ऑनलाईन पद्धतीने अद्यावत अशा‍ नविन एकात्मिक लॉटरी प्रणाली (IHLMS 2.0) अंतर्गत 3070 अर्जांची नोंदणी झालेली असून 2225 अर्जदारांनी सोडतीत भाग घेण्याकरीता अनामत रक्कमेचा भरणा केलेला आहे.

उपरोक्त अर्जाची संगणकीय सोडत 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वा. राजीव गांधी सभागृह, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, सी.बी.एस. रोड, औरंगबाद येथे होणार आहे. संगणकीय सोडत उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण मुंबई, यांचे हस्ते व्हर्चुअल पद्धतीने करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आलेले आहे.

Back to top button
error: Content is protected !!