पैठणफुलंब्री
Trending

पैठण तालुक्यातील फारोळा येथील वृद्ध दाम्पत्याचा खून, फुलंब्री तालुक्यातील आरोपी जेरबंद !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – पोलीस ठाणे बिडकीन हद्यीतील फारोळा येथे वृध्द दाम्पत्याचा खून करुन चोरी करणाऱ्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे बिडकीन कडून पर्दाफाश करण्यात आला. फुलंब्री तालुक्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यास बिडकीन पोलिसांच्या हवाली केले आहे. आसेफ शब्बीर सय्यद (वय २७ वर्षे, रा. लिहा जहांगिर ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. फारोळा झोपडपट्टी ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक १८/१२/२०२२ रोजी किशोर भीमराव खरनाळ (वय ३४वर्ष, व्यवसाय हॉटेल मालक रा. फारोळा तांडा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलीस ठाणे बिडकीन येथे फिर्याद दिली की, दिनांक १७/१२/२०२२ रोजी रात्री ११:०० ते दिनांक १८/१२/२०२२ रोजी सकाळी ०९:३० वाजे दरम्यान वडिल भीमराव रामराव खरनाळ (वय ६५ वर्षे) व आई  शशीकला भीमराव हरनाळ (६० वर्षे) यांचा अज्ञात मारेकर्याने खून करुन आईच्या गळ्यातील, सोन्याचे डोरले, कानातील झुंबर, कुडके तसेच पायातील चांदीचे पैंजन, जोडवे चोरून नेले. या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे बिडकीन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्हयाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी गुन्हयाच्या घटनास्थळास भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास व पोलीस ठाणे बिडकीन येथील पथकास तपासकामी सूचना व मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे बिडकीनचे पथक तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणावरून खात्रीलायक माहिती मिळाली की, हा गुन्हा आसेफ शब्बीर सय्यद (वय २७ वर्षे, रा. लिहा जहांगिर ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. फारोळा झोपडपट्टी ता. पैठण) याने केला आहे.

ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने आरोपींचा शोध घेतला असता आरोपी आसेफ शब्बीर सय्यद हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. आरोपीस सदर गुन्हयाचे तपासकामी पोलीस ठाणे बिडकीन पोलीसांच्या ताब्यात दिले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे बिडकीन हे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग पैठण विशाल नेहूल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, सपोनि रामचंद्र मुंजे, पोउपनि विजय जाधव, प्रदीप दूबे, सय्यद झिया, सफौ बालू पाथ्रीकर, दगडू जाधव पोह लहू थोटे, श्रीमंत भालेराव, दीपेश नागझरे, संजय घुगे, संतोष पाटील, नामदेव सिरसाठ पोना दीपक सुरोसे, परमेवर आडे, नरेंद्र खंदारे, उमेश बकले, शेख अख्तर, पुष्पांजली इंगळे, पोकों ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर, संतोष डमाळे योगेश तरमाळे व पोलीस ठाणे बिडकीन येथील सपोनि संतोष माने, पोउपनि महेश घुगे यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!