राजकारण
Trending

काँग्रेस फुटीच्या बातम्या धादांत खोट्या, काही मंडळींकडून जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जाताहेत: बाळासाहेब थोरात

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- काँग्रेस फुटीच्या बातम्या धादांत खोट्या असून काही मंडळींकडून जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जात आहेत, असा दावा कॉंग्रेस नेतेत तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, ट्रिपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, सरकारमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. महागाई आणि बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर आहे. या सर्व नकारात्मक वातावरणात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.

विरोधी पक्ष एकजुटीने लढतो आहे. अशावेळी संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहे. माध्यमेही त्याला प्रसिद्धी देत आहेत.

राज्यातील काँग्रेस संदर्भातील या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या आहेत. काँग्रेस एकजूट आहे. जनविरोधी सरकारच्या विरोधात आम्ही संघर्ष करत राहू, असेही बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

Back to top button
error: Content is protected !!