महाराष्ट्र
Trending

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाच घेताना पकडला ! खंडित केलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी घेतले 3 हजार !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. 27 – विजेचे बील न भरल्यामुळे खंडित करण्यात आलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी 3 हजारांची लाच घेतना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह दोघांना पकडण्यात आले.

सुरेश प्रकाश गुंजाळ (वय 30 वर्षे, व्यवसाय- वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण कार्यालय, राणी ऊचेगाव, तालुका घनसावंगी) व बालाजी भिकाजी शिंगटे (वय 35 वर्षे, बाह्यस्रोत टेक्निशियन) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार हे महावितरण चे ग्राहक आहेत. त्यांच्या घरी असलेले वीज कनेक्शन वीज बिल न भरल्यामुळे तोडण्यात आले होते. तोडण्यात आलेले वीज कनेक्शन परत जोडून देण्यासाठी सुरेश प्रकाश गुंजाळ यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी करून बालाजी भिकाजी शिंगटे यांनी पंचा समक्ष लाच स्वीकारली आहे.

ही कारवाई संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सुदाम पाचोरकर, पोलीस उपाधीक्षक, सापळा पथक :- पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मस्के, जावेद शेख, गणेश बुजाडे, कृष्णा देठे, गजानन कांबळे, शिवाजी जमधडे, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे (सर्व ला.प्र.वि, जालना) यांनी केली आहेे.

Back to top button
error: Content is protected !!