राजकारण
Trending

तुमचा लवकरच दाभोळकर होणार; ज्येष्ठ नेते शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी !

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; खासदार सुप्रिया सुळे आणि शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्तांची घेतली भेट

मुंबई दि. ९ जून – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, जर काही बरं वाईट झालं तर गृहमंत्रालय याला जबाबदार राहील अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी नंतर प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. ही गंभीर बाब लक्षात आल्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी सोशल मीडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलिस आयुक्तांना देण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Back to top button
error: Content is protected !!