छत्रपती संभाजीनगर
Trending

निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी: समस्यांचे निवारण आता व्हॉट्सॲप, झूम कॉलद्वारे !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.२९ :- जिल्हा कोषागारातंर्गत निवृत्ती वेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी महालेखापाल, लेखा व हकदारी -२ नागपूर यांचे तर्फे सेवनिवृत्तांचे समाधान (PENSIONERS SAMADHAN) नावाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

या उपक्रमाद्वारे निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचे निराकरण प्रत्यक्ष व्हाट्सएप व्हिडीओ कॉल अथवा झूम कॉल द्वारे करण्यात येणार आहे. त्याकरीता निवृत्तीवेतनधारकाने https://cag.gov.in/ae/nagpur/en या लिंक द्वारे किंवा टोल फ्री नं १८००२३३७८३४ अथवा ०७१२-२९९२२५० या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या तक्रारी नोंदवण्यात याव्यात. त्यानंतर प्रत्यक्षात निवृत्तीवेतनधारकांना संपर्क साधून त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्याची कार्यवाही महालेखापाल नागपूर-२ यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येईल.

याबाबतच्या तपशिलावर कार्यपद्धतीसाठी निवृत्तीवेतन शाखा, वरिष्ठ कोषागार अधिकारी यांचे कार्यालय येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक संचालक (निवृत्तीवेतन) श्रीमती सुषमा बुरकुले कोषागार कार्यालय यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!