महाराष्ट्र
Trending

ऑटीझम (स्वमग्नता) आजाराच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ, प्रत्येक जिल्ह्यात ऑटीझम सेंटर सुरु करा: अजित पवार

मतीमंद आणि स्वमग्न मुले या दोन्हीमध्ये खूप तफावत

नागपूर, दि. २१ डिसेंबर – ऑटीझम (स्वमग्नता) हा आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मतीमंद मुले आणि स्वमग्न मुले या दोन्हीमध्ये खूप तफावत आहे. स्वमग्न मुलांना सगळ्या थेरपी एकत्र मिळण्याची आवश्यकता असते. ऑटीझम रुग्णांना जिल्हा पातळीवर तातडीने निदान आणि उपचार मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटीझम सेंटर सुरु करण्याची आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

ऑटीझम (स्वमग्नता) झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शहरी भागात काही प्रमाणात यावर उपचार मिळत आहेत, मात्र ग्रामीण भागात या आजारांवर उपचार मिळत नाहीत. या आजाराचे लवकर निदान झाले तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. त्यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर ऑटीझम सेंटरची निर्मिती करण्यात यावी.

महाविकास आघाडी सरकार असताना प्रत्येक जिल्ह्यात ऑटीझम सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी अशी सेंटर झाली तर लवकर ऑटीझमग्रस्त मुलांवर तातडीने उपाचार होतील.

त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या किमान जिल्ह्याच्या ठिकाणी सेंटर्स उभारण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

Back to top button
error: Content is protected !!