महाराष्ट्र
Trending

तलाठी लाचेच्या सापळ्यात अडकला, 48 गुंठ्याच्या फेरफारसाठी फोन पेद्वारे घेतले ५ हजार !

अहमदनगर, दि. २६ – तलाठी लाचेच्या सापळ्यात अलगद अडकला. 48 गुंठ्याच्या फेरफारसाठी फोन पेद्वारे ५ हजार रुपये घेताना त्यास पोलिसांनी पकडले. रामेश्वर भागवत गोरे (तलाठी, वर्ग-३ नेमणुक-सजा खांडके, ता. नगर, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांनी दिनांक २०/०२/२०२३ रोजी त्यांचे नावावरील ४८ गुंठे जमीन विकली होती. विक्रीनंतर सदर जमीनीची नोंद शासकीय अभिलेखात करून देण्याची जबाबदारी तक्रारदार यांनी घेतली होती. दि. २१/०२/२०२३ रोजी तक्रारदार यांनी सदर दस्त व सुची २ हे आरोपी रामेश्वर भागवत गोरे (तलाठी, वर्ग-३, नेमणुक-सजा खांडके, ता. नगर, जि. अहमदनगर) यांना देऊन खरेदी घेणारे व्यक्तीचे नावाची नोंद शासकीय अभिलेखात घेऊन फेरफार मिळणेकामी विनंती केली होती.

त्यावेळी आरोपी तलाठी रामेश्वर भागवत गोरे याने तक्रारदार यांचेकडे रुपये ५०००/- ची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर यांचेकडे दि. २४/०२/२०२३ रोजी तक्रार केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.२४/०२/२०२३ रोजी लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी तलाठी रामेश्वर भागवत गोरे याने पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे रुपये ५०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावरून दि. २४/०२/२०२३ रोजी सुरभी हॉस्पिटल चौकात लाचेचा सापळा आयोजित केला.

आरोपी तलाठी गोरे याने तक्रारदार यांना लाचेची रक्कम फोन पे व्दारे त्याच्या बँक खातेवर टाकण्यास सांगितली व ५०००/- रुपये त्याचे स्वतःचे खात्यावर आल्याबाबत खात्री करून तेथून निघून गेला. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल वरून आरोपी तलाठी रामेश्वर भागवत गोरे यांच्या मोबाईलवर फोन पे व्दारे पाठविलेले ५०००/- रुपये आरोपी तलाठी गोरे याच्या खात्यावर वर्ग झाल्याची पंचासमक्ष खात्री करून आरोपी लोकसेवक याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

Back to top button
error: Content is protected !!