छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगर शहरातील १० झोनमध्ये ४७ ठिकाणी संकल्प यात्रा रथ फिरणार, नोंदणी करून योंजनांचा घ्या लाभ !

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी संकल्प यात्रा रथ शहरभर फिरणार

Story Highlights
  • लाभार्थ्यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.२८- केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी व या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे उद्घाटन कार्यक्रम सिद्धार्थ उद्यान येथे पार पडला. ग्रामीण व शहरी भागात दोन भागांत संकल्प यात्रा रथ फिरणार आहेत. शहरी भागातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती होण्यासाठी व त्याचा लाभ होण्यासाठी या संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

आज सिद्धार्थ उद्यान येथे पिएम स्वानिधी योजने अंतर्गत लाभ मिळालेल्या देवशाली झिने, नसरीन सय्यद रफिक व शेहनाज शेख जावेद या लाभार्थ्यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, संकल्प यात्रा क्षेत्रीय अधिकारी संतोष देशमुख, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, संकल्प यात्रा नोडल अधिकारी तथा उप आयुक्त ०४ अंकुश पांढरे, उप आयुक्त अपर्णा थेटे, सोमनाथ जाधव, शहर अभियंता ए बी देशमुख, उप संचालक नगर रचना मनोज गरजे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, उद्यान अधिक्षक विजय पाटील, कार्यकारी अभियंता बी डी फड, आर एन संधां, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी अर्चना राणे आदींची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्षेत्रीय अधिकारी संतोष देशमुख यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी संकल्प यात्रेचे नियोजन बाबत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की सदर संकल्प यात्रा रथ शहरातील १० झोन अंतर्गत ४७ ठिकाणी फिरणार असून या ठिकाणी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांना अद्याप या योजनांचा लाभ मिळाला नाही असे लाभार्थी या ठिकाणी आपली नोंदणी करून या योजनांचा लाभ घेऊ शकतील. तसेच दररोज सकाळी व सायंकाळी दोन सत्रात सदर रथ त्या त्या प्रभागात फिरणार आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रशासक जी श्रीकांत यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करून सांगितले. यावेळी ते म्हणाले की सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेणे हा लोकांचा हक्क आहे. नागरिकांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.
यात प्रधानमंत्री आवास योजना शहरी,आयुष्यमान भारत, पिएम् सवनिधी, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय, अमृत २.० योजना व खेलो इंडिया या सहा योजनांचा समावेश आहे. यासोबतच या ठिकाणी केंद्र सरकारच्या आणखी विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांना अद्याप कोणताही लाभ मिळाला नाही असे लाभार्थी या ठिकाणी आपली नोंदणी करून या योजनांचा लाभ घेऊ शकतील.
दोन सत्रात प्रत्येक झोन मधील विविध ठिकाणांसोबत गर्दीच्या ठिकाणी सुध्दा संकल्प यात्रा रथ फिरणार असून शहरातील नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ज्या लाभार्थ्यांच्या हस्ते संकल्प यात्रेचे उद्घाटन करण्यात आले त्यामध्ये देवशाली झीने, रां.नारेगाव. बचत गट, नसरीन सय्यद रफिक, कोहिनूर कॉलनी भाजी विक्रेता लोन रु.५००००/-, फिरोज खान इब्राहिम खान ,नेहरू नगर ,कटकट गेट भाजी विक्रेता – लोन ५००००/- शेहनाझ शेख जावेद ,कोहिनूर कॉलनी भाजी विक्रेता लोन रु ५००००/- या लाभार्थ्यांचे समावेश आहे.

या संकल्प यात्रा रथावर विद्यार्थांसाठी क्यू आर कोड असून यावर स्कॅन केल्यावर त्यावरील प्रश्नाची उत्तरे दिल्यावर बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी रथ फिरणार आहे. त्या ठिकाणी कॅम्प सुध्दा असणार आहे. या कॅम्पमध्ये वंचित लाभार्थी आपली नोंदणी करून योग्य त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील. सदरील रथ यात्रा दि २२ डिसेंबर रोजी पर्यंत सुरू राहणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख,शाखा प्रमुख,कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!