मार्केट लाईव्हसिल्लोड
Trending

सिल्लोड मोंढा मार्केटमधील कृषी सेवा केंद्राचे गोडाऊन फोडले ! साडेतीन लाखांचा माल लंपास, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ !!

शेतीविषयक किटकनाशक, औषधींच्या 15 पेट्या चोरीस

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – सिल्लोड मोंढा मार्केटमधील कृषी सेवा केंद्राचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांचा माल लंपास केला. शेतीविषयक किटकनाशक औषधींच्या वेगवेगळ्या 15 पेट्या चोरीस गेल्या. या चोरीमुळे व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली असून चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सूत्रे फिरवली आहेत.

अशिषकुमार मोतीसिंग गौरठाकुर (वय 50 वर्षे व्यवसाय व्यापार, रा शास्त्री कॉलनी सिल्लोड ता. सिल्लोड) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, महावीर चौक येथे आकाश एजन्सी / कृषी सेवा केंद्र दुकान आहे. व मोढा माकेर्ट सिल्लोड येथे 8 नंबरचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये अशिषकुमार मोतीसिंग गौरठाकुर यांच्या कृषी सेवा केंद्राचा माल बियाणे, कीटक नाशक रासायनीक खते, पाइप, ठिबक सिचन आदी प्रकारचे बियाण्यांचा साठा असतो.

दिनांक 02/01/2023 रोजी अशिषकुमार मोतीसिंग गौरठाकुर यांनी त्यांच्या आकाश एजन्सीवर व्यापार केला. त्यानंतर दुपारी 04.30 वाजता मोंढ्यातील गोडाऊनमध्ये औषधाच्या दोन पेट्या काढून शटर लॉक केले. त्यानंतर एजन्सीवर परत आलो व आकाश एजन्सीवर रात्री 08.00 वाजेपर्यंत औषधांची देवानघेवान केली. त्यानंतर दुकान बंद करून अशिषकुमार मोतीसिंग गौरठाकुर घरी गेले.

दिनांक 03/01/2023 रोजी नेहमी प्रमाणे अशिषकुमार मोतीसिंग गौरठाकुर हे आकाश एजन्सीवर आले. दुपारी 03.30 वाजेच्या सुमारास दुकानातील कीटकनाशक औषधाचा स्टॉक संपल्याने अशिषकुमार मोतीसिंग गौरठाकुर हे लहान भाऊ अनिल मोतीसिंग गौरठाकुर यांना दुकानावर थांबवून ते औषधी आण्यासाठी मोंढ्यातील गोडावून नं 08 वर गेले. शटरचा लॉक उघडून आत गेले असता गोडाऊनच्या पाठीमागील बाजुस खीडकीचा उजेड पडलेला त्यांना दिसला.

कोणीतरी खिडकी व त्याचा पत्रा घेवून गेलेले त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी अशिषकुमार मोतीसिंग गौरठाकुर यांनी भाऊ आकाश मोतीसिंग गौरठाकुर यांना फोन करुन गोडावूनवर बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी गोडावूनमधील मालाची पाहणी केली असता, चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

गोडाऊन मधील शेतीविषयक किटकनाशक औषधाच्या वेगवेगळ्या 15 पेट्या एकूण 369940/- रुपये किंमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी अशिषकुमार मोतीसिंग गौरठाकुर यांनी दिलेल्या तक्रारीवरू सिल्लोड शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!