छत्रपती संभाजीनगर
Trending

जालन्याच्या आरोपीचा छत्रपती संभाजीनगरच्या युवकाला गंडा ! पोस्ट ऑफिसमध्ये नौकरीचे आमिष दाखवून ३ लाख घेतले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – पोस्ट ऑफिसमध्ये नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून युवकाला ३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी जालन्याच्या आरोपीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने युवकाकडून फोन पे व रोख अशा दोन्ही स्वरुपात रक्कम घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ओमप्रकाश नारायण गायकवाड (वय –39 वर्षे, राहणार –मु. कुकडगाव, पोस्ट. सुकापुरी, तालुका – अंबड, जिल्हा – जालना) असे आरोपीचे नाव आहे. सुमेध भगवान तुपे (वय – 36 वर्षे, व्यवसाय – शिक्षण, राहणार – रामनगर, मुकूंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

सुमेध तुपे याने याने फिर्यादीत म्हटले आहे की, पोस्ट आँफिस येथे नोकरीला लावून देतो असे खोटे आमिष दाखवून आरोपी ओमप्रकाश गायकवाड याने विश्वास संपादन केला. गायकवाड याने सुमेध तुपे याच्याकडून 2,30,000/- रुपये (दोन लाख) Phone Pay च्या माध्यमातून व 70,000/- रुपये (सत्तर हजार) रोख रक्कम असे एकूण 3,00,000/- रुपये (तीन लाख) घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुमेध तुपे याने मुकुंदवाडी पोलिस स्टेशन गाठून पोलिसांसमोर घडलेली हकीकत कथन केली. 16/02/2023 ते 26/06/2023 दरम्यान, रामनगर मुकूंदवाडी व Phone Pay द्वारे हा पैशांचा व्यवहार झाला.

याप्रकरणी सुमेध भगवान तुपे याने ओमप्रकाश नारायण गायकवाड याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून 359/2023 कलम 417, 420 भा द वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि समाधान वाठोरे करीत आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!