महाराष्ट्र
Trending

दिव्यांगाची आरोग्य तपासणी करून त्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे देणार !

शिबिराचा लाभ घ्यावा - खासदार फौजिया खान

परभणी, दि. २० – जिल्ह्यातील गरीब व पात्र दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे मिळावीत यासाठी ALIMCO या केंद्र शासनाच्या अंगीकृत संस्थेकडे पाठपुरावा करून लाभार्थी निवडीसाठी‌ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांगाची पूर्व तपासणी करून त्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार फौजिया खान यांनी केले आहे.

ही शिबिरे तालुकानिहाय आयोजित केली असून, आज आज २० ऑगस्ट रोजी अल्मंड फंक्शन हॉल, येलदरी रोड जिंतूर तर २२ ऑगस्टला रेणुका मंगल कार्यालय, सेलू येथे असून, त्याचे आयोजक माजी आमदार विजय भांबळे आहेत. तसेच २३ रोजी मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालय, २४ रोजी पाथरीतील खान अब्दुल गफार खान विद्यालय आणि २५ ऑगस्टला सोनपेठ येथील व्यंकटराव कदम विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजक आमदार बाबाजानी दुर्राणी आहेत. या सर्व ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ALIMCO मार्फत पाठविलेल्या डॉक्टराद्वारे लाभार्थी निवडीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठा दिव्यांगांनी सोबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेले ४० टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, दरमहा २२ हजार ५०० पेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईझ छायाचित्रे सोबत आणावीत.

जिल्ह्यातील गरीब व दिव्यांगांसाठी शासनाच्या ADIP योजनेतून मोफत उपकरणे व कृत्रिम अवयव मिळाल्यास या दिव्यांगाचे पुढील आयुष्य सुखकर होणार आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्य उपकरणे मिळण्यासाठी पात्र लाभार्थी ठरविण्यासाठी शिबिरे आयोजित केली आहेत. येथेच तपासणी करुन लाभ देण्यासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दिव्यांगांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन खासदार फौजिया खान यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!