छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने भरला ६७ लाखांचा मालमत्ता कर !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.३० – शहरातील श्री सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेच्या मालमत्ता कराबाबत न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणातील आक्षेपार्ह रक्कम वगळून इतर कराची रक्कम महानगरपालिकेने वसुल केली. यात श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने भरला ६७ लाखांचा मालमत्ता कर भरला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत मालमत्ता कर वसुली मोहीम जोरदार सुरू आहे. शहरातील श्री सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेच्या मालमत्ता कराबाबत न्यायालयामध्ये वर्ष २०१२ -२०१३ पासून विविध प्रकरणे दाखल होती. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने सदर शैक्षणिक संस्थेला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १३२-१ (ब) नुसार सामान्य कर व इतर करातून सूट द्यावी असे संस्थेचे म्हणणे दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयाने तात्पुरता मनाई हुकूम दिला होता.

दाखल प्रकरणांमध्ये याच मिळकती बाबत विविध प्रकरणे दाखल झाले होते. सदरील संस्थेच्या एकूण १५ मालमत्ता ह्या न्यायालयीन प्रकरणात अंतर्भूत होत्या. आयुक्तांनी मालमत्ता कर वसुली बाबत आढावा बैठक घेतली असता त्यांचे असे निदर्शनास आले की शहरातील बऱ्याच शैक्षणिक संस्था ह्या न्यायालयामध्ये गेल्या असून न्यायालयामध्ये न्यायालयाचा तात्पुरता मनाई हुकूम असून त्यांचा आक्षेप असलेला कर आहे.

तो वगळून इतर कोणत्याही कराची वसुली महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासक यांनी या प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर श्री सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेचा मनपाकडे जो आक्षेप नोंदवलेला होता त्या बद्दल सुनावणी घेतली असता स्थायी समितीच्या ठराव अन्वये न्यायालयाच्या अधीन राहून प्रकरण प्रलंबित असे पर्यंत सामान्य कर, रोजगार हमी कर व राज्य शिक्षण कर वगळून इतर कर घेण्यात यावे असा महत्वपूर्ण निकाल दिला.

या निर्णयानुसार आज दि.३० नोव्हेंबर रोजी झोन कार्यालय क्र.०२ येथे सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेने एकूण १५ मालमत्तांचे कर रु.६७,१०,८२१/- धनादेशाद्वारे भरणा केला. आता महानगरपालिकेतर्फे अशी जी न्यायालयीन प्रकरणे आहेत आणि न्यायालयाच्या आदेशानुसार आक्षेपार्ह रक्कम सोडून इतर रक्कम वसूल करण्यास प्रतिबंध नाही.

अशा प्रकरणांमध्ये प्रशासक जी श्रीकांत यांच्या सूचनेनुसार व उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेऊन अशा न्यायालयीन प्रकरणात वसुलीचे काम जोरदार सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी सहायक आयुक्त रमेश मोरे झोन ०२ ,पथक प्रमुख राजू राठोड, नितीन खोकले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button
error: Content is protected !!