पैठण
Trending

पैठणच्या वकीलाचा पाचोड फाट्याजवळ पैठण पाचोड रस्त्यावर अपघातात मृत्यू ! पळून जाणारा ट्रक शेवगाव रोडवर पकडला !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३०- भरधाव ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने सदर ट्रकला पाठीमागून मोटारसायकल धडकली. यात पैठण येथील मोटारसायकलस्वार वकीलाचा मृत्यू झाला. ही घटना  पाचोड फाटा जवळ पैठण पाचोड रोडवर रात्रीच्या सुमारास घडली.

अँड. कृष्णा उर्फ आशिष देविदास निवारे (वय 43 वर्षे, कावळे गल्ली पैठण) असे अपघातात मृताचे नाव आहे. पैठण न्यायालयात ते वकीली करत. दि. 26/11/2023 रोजी कृष्णा निवारे हे रात्री 09.30 वाजेच्या सुमारास पाचोड फाटा येथे कामानिमीत्त गेले होते. रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ते पॅशन प्रो या मोटारसायकलने घराकडे परतत होते. पाचोड फाटा जवळ पैठण पाचोड रोडवर पाचोड कडून पैठणकडे येणारी ट्रकने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मोटारसायकल ट्रकच्या पाठीमागील बाजुस धडकली.

अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रकसह चालक पसार झाला. या अपघातात अँड कृष्णा उर्फ कृष्णा निवारे यांच्या डोक्याला, छातीला गंभीर स्वरुपाचा मार लागला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सरकारी दवाखान पैठण येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, ट्रकचा पाठलाग करुन सदरचा ट्रक हा पैठण ते शेवगांव रोडवर पकडण्यात आला.

याप्रकरणी प्रविण देवीदास निवारे (रा. पैठण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MH 16 CD 9197 क्रमांकाच्या ट्रक चालकावर पैठण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!