छत्रपती संभाजीनगर
Trending

अजिंठा अर्बन बॅंकेतील खातेदारांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी : दुसऱ्या टप्प्यात ७५०० क्लेमधारक ठेवीदारांच्या खात्यावर १६० कोटींची रक्कम दोन आठवड्यांत जमा होणार !!

९७.४१ कोटींचा घोटाळा, विम्यासाठी क्लेम केलेल्या ठेवीदारांनी घाबरून जाण्याची गरज नसून ५ लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- अजिंठा अर्बन को.ऑप. बॅंकेतील ठेवीदारांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ५२ ठेवीदारांच्या खात्यावर १४ लाखांची क्लेम रक्कम जमा झाल्यानंतर उर्वरित क्लेमधारकांच्या खात्यावर क्लेमची रक्कम जमा करण्याची प्रोसेस सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण १५८ ते १६० कोटी रुपयांची रक्कम ७५०० क्लेमधारक खातेधारकांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही रक्कम येत्या दोन आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, क्लेम केलेल्या खातेदारांच्या ५ लाखांपर्यच्या सर्व ठेवीं सुरक्षित असून लवकरात लवकर त्या मिळण्यासाठी बॅंक स्तरावरून पाठपुरावा करण्यात येत आहे. ठेवींदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेचे प्रशासक सुरेश काकडे यांनी केले.

अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेचे प्रशासक सुरेश काकडे यांनी दिलेली अधिकृत माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेवर भारतीय रिझर्व बँकेच्या दि.28.08.2023 च्या आदेशान्वये दि. 29.08.2023 पासून सर्व प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले आहे.

बँकेच्या सर्व ठेवींदारांचे क्लेम (ठेव रक्कम परत मिळण्यासाठी सादर करावयाचा अहवाल) बँकेने विहित कालावधीत म्हणजेच दि. 13.10.2023 रोजी DICGC कडे सादर केलेला आहे. DICGC कडून दि. 04.12.2023 च्या पत्राद्वारे असे कळवीले आहे, की योग्य व अधिकृत क्लेम्स DICGC स्तरावर तपासणी करण्याचे कामकाज चालु आहे.

५ लाखापर्यच्या सर्व ठेवीं सुरक्षित असून लवकरात लवकर त्या मिळण्यासाठी बैंक स्तरावरून पाठपुरावा करण्यात येत आहे. ठेवींदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बँकेच्या प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेचे प्रशासक सुरेश काकडे यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबरला ५२ खातेदारांना मिळाली क्लेमची रक्कम
पहिल्या टप्प्यात ५२ ठेवीदारांचा क्लेम मंजूर करण्यात आला असल्याचा ईमेल Reserve Bank of India ने अजिंठा अर्बन को. ऑप. बँकेला दि. २३ नोव्हेंबर रोजी पाठवला आहे. ज्या ठेवीदाराची क्लेम रक्कम ९२ हजार रुपयांच्या आत आहे अशा ५२ ठेवीदारांचा क्लेम पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आला आहे.

दुसर्या टप्प्यात एकूण १५८ ते १६० कोटी रुपयांची रक्कम ७५०० क्लेमधारक खातेधारकांच्या बॅंक खात्यावर दोन आठवड्यात जमा होणार- पहिल्या टप्प्यात ५२ क्लेमधारक खातेदारांच्या बॅंक अकाउंटवर रक्कम झाल्यानंतर सर्व खातेदारांच्या आशा पल्लवित झाल्या.  २३ नोव्हेंबर नंतर लगेच दुसर्या टप्प्यातील रक्कम खातेदारांच्या अकाउंटवर जमा होणे अपेक्षित होते. मात्र, बराच कालावधी उलटूनही क्लेमची रक्कम मिळत नसल्याने खातेदारांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अनेक जण बॅंकेवर चालून गेले आणि कर्मचार्यांना धारेवर धरून जाब विचारू लागले. परंतू, बॅंकेचे प्रसासक सुरेश काकडे हे सातत्त्याने RBI आणि DICGC यांच्या नेमून दिलेल्या अधिकार्यांशी संपर्कात होते व क्लेमचा पाठपुरावा करत होते. त्याच पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून DICGC कडून दि. 04.12.2023 रोजी अजिंठा बॅंकेला पत्र प्राप्त झाले आहे. लवकरात लवकर म्हणजे येत्या दोन आठवड्यात क्लेमधारकांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा होणार असल्याच्या आशयाचे ते पत्र आहे.

दोन महिन्यांच्या आत DICGC ला क्लेमची रक्कम देणे बंधनकारक- बॅंकेकडून खातेदारांची दावा यादी मिळाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत प्रत्येक ठेवीदाराच्या दाव्याची जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंत देण्यास DICGC जबाबदार आहे. योग्य व अधिकृत प्रत्येक विमाधारक ठेवीदाराला त्यांच्या दाव्याच्या रकमेशी संबंधित दाव्याची रक्कम (जास्तीत जास्त ५ लाख रुपये) वितरित करणे DICGCला बंधनकारक आहे. यानुसार बँकेने विहित कालावधीत म्हणजेच दि. 13.10.2023 रोजी DICGC कडे क्लेम दाखल केलेला आहे. यानुसार दि. 12.12.2023 रोजी दोन महिने पूर्ण होतील. अर्थात या बॅंकेच्या खातेदारांची क्लेम यादी मोठ्या प्रमाणात असल्याने व्हेरिफिकेशनसाठी जास्त कालावधी लागत असल्याचे बोलले जात आहे. तरीही दोन महिन्यांच्या आत खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे दि. 12.12.2023 या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

प्रथम माहिती अहवालानुसार ९७.४१ कोटींचा घोटाळा- अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे 1) सुभाष मानकचंद झांबड, (चेअरमन), 2) प्रदीप एकनाथ कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), 3) सतीश मोहरे (सनदी लेखापाल), आणि दिनांक 01/03/2006 रोजी 10.30ते दिनांक 30/08/2023 रोजी 5.30 या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकरी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज दिले. तसेच खोट्या व बनावट नोंदी घेवून खोटा हिशेब तयार करून बँकेची सुमारे 97.41 कोटी रूपये रक्कमेचा अपहार करून आर्थिक फसवणुक केली असल्याचे सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. बँकेचे संचालक मंडळ, व बँकेचे इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून ३६ कर्जदारांना विनातरण कर्ज वाटप केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

असुरक्षित, खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्जाचे वाटप- अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वर्ग-1, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा काकडे यांनी उघडकीस आणला आहे. असुरक्षित, खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्ज वाटप केल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. चेअरमन सुभाष झाबंड, सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें यांच्यासह त्या काळातील संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून हा घोटाळा केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें या दोघांना सुरुवातीला अटक केलेली आहे. त्यानंतर उस्मानपुरा, जाधवमंडी येथील दोन शाखा व्यवस्थापकासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य सूत्रधार चेअरमन सुभाष झांबड हे अद्याप फरार आहेत.

असुरक्षित कर्जदारांच्या KYCचा शोध सुरु- अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेतील ९७.४१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडवर काम करत असून पोलिसांनी बॅंकेतील संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार 36 कर्जधारकांना असुरक्षित कर्ज वाटप करण्यात आले असून यातील काही कर्जदारांच्या केवायसीच पोलिसांना मिळाल्या नसल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. कर्जदारांच्या या फाईलीचे संपूर्ण रेकॉर्ड मिळत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. असुरक्षित कर्जदारांची KYC सदर्भातील संपूर्ण माहिती पोलिस शोधत आहे.

13 तारखेलाच आपण सर्व प्रकारच्या ठेवीदारांचे क्लेम सादर केले- अजिंठा नागरी सहकारी बँकेला रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूर यांच्याकडून 28/8/2023 रोजी बँकेला AID (ऑल इन्क्लूजिव्ह डायरेक्शन) लागू करण्याबाबत पत्र दिलं. सदरचे डायरेक्शन हे 29/8/2023 पासून लागू करण्यात आलेले आहेत. सर्व ठेवीदारांचे मॅक्झिमम पाच लाखापर्यंतचे ठेव रक्कम हे DICGC कडे क्लेम स्वरूपात सादर करायचे होते. ही क्लेम करायची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर २०२३ होती. 13 तारखेलाच आपण सर्व प्रकारच्या ठेवी सर्व ज्यांचे विलिंगनेस आलेले असतील नसतील वगैरे अशा सर्व ठेवीदारांचे क्लेम आपण DICGC दिलेले आहेत.

५ लाखांपेक्षा ज्यास्त ठेवीची रक्कम मिळण्याची अशी असेल प्रोसेस- ५ लाखापर्यंतचे सर्व क्लेम केल्यानंतर बँक कर्जदारांकडील रिकव्हरीची प्रोसेस सुरू करेल. म्हणजे ज्या कर्जदारांकडे थकीत असलेल्या कर्जाची रक्कम वसुल करणार. रिकवरीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा DICGC कडून जी क्लेम स्वरूपात रक्कम घेऊ ती रक्कम DICGCला  परत केल्यानंतर उर्वरित जी रक्कम शिल्लक राहणार आहे त्या पाच लाखांच्या वरील ठेवीदारांना परत केल्या जातील.

बॅंकेत एकूण 47 हजार अकाउंट, ३५० कोटींच्या ठेवी- साधारणत: प्राथमिक स्वरूपामध्ये 47 हजार अकाउंट आहेत. ३५० कोटी पर्यंतच्या एकूण ठेवी आहेत. ज्या तारखेला एआयडी लागलेला आहे. त्या तारखेची ही परिस्थीती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सेविंग अकाउंट मुदत ठेवी पुन:गुंतवणूक या सगळ्या प्रकारच्या ठेविचा त्यामध्ये समावेश आहे.

टप्प्या-टप्याने व पॅरलल यंत्रणा काम करतेय- सध्या रिकव्हरीचे टप्पे सुरुच होणार आहेत. आता पहिला टप्पा क्लेमचा आहे. त्यानंतर कर्जाची वसुली करणे आदी पॅरलल ही यंत्रणा सुरुच होणार आहे. अर्थात क्लेमचा पहिला टप्पा आता बॅंकेच्या बाजून अंतिम टप्प्यात असून तो DICGC कडे सादर करण्यात आलेला आहे.

Back to top button
error: Content is protected !!