महाराष्ट्र
Trending

माझ्या बहिणीला मारहाण केली, तुला आता जीवे मारतो ! विषारी द्रव पाजण्याचा प्रयत्न, घनसावंगी तालुक्यातील युवकावर राणी उंचेगावजवळ हल्ला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – माझ्या बहिणीला मारहाण केली, तुला आता जीवे मारतो असे धमकावून चौघांनी हल्ला चढवला. विषारी द्रव पाजण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यातून कशीबशी सुटका करून जखमी युवकाने त्याच्या भावाला बोलावून घेतले व अंबडच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाला. जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील भारत पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली.

विजय सीताराम चव्हाण (वय 26 वर्षे व्यवसाय शेती रा. लिंबानाईकतांडा राणी उंचेगाव ता. घनसावंगी जि. जालना) असे जखमीचे नाव आहे. उपजिल्हा रुग्णालय अंबड येथी अपघात विभागात उपचार करण्यात आला. विजय चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 20/06/2023 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी विजय चव्हाण मोटार सायकल घेवून राणी उंचेगाव येथील भरत मंत्री यांच्या भारत पेट्रोलपंप येथे पेट्रोल टाकण्यासाठी गेला होता.

तेथे मोटार सायकलमध्ये पेट्रोल टाकून घराकडे जात असतांना पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर 1) विकास भयलाल राठोड 2) महेश संतोष राठोड 3) कृष्णा गणेश राठोड (सर्व रा. कृष्णनगरतांडा) व अन्य एक जण असे दोन मोटार सायकलवर आले. त्यांनी विजय चव्हाण यास थांबवले व म्हणाले की, तू माझ्या बहिणीला मारहाण केली. तुला आता मी जीवंत मारतो असे म्हणून त्यांनी चापटबुक्क्यांनी लाथांनी मारहाण केली.

सर्वांनी विजय चव्हाण याला पकडले त्यांनी द्रव पाजण्याचा प्रयत्न केला. विजय चव्हाण याने हिसका दिला मात्र त्याच्या तोंडावर व अंगावर विषारी द्रव पडले. त्यांच्या तावडीतून पळून विजय चव्हाण हा पेट्रोलपंपावर आला. तेथे भावाला बोलावून घेतले व त्याला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सरकारी दवाखाना अंबड येथे उपचार चालू आहे. सध्या प्रकृती चांगली आहे.

विजय सीताराम चव्हाण (वय 26 वर्षे व्यवसाय शेती रा. लिंबानाईकतांडा राणी उंचेगाव ता. घनसावंगी जि. जालना) याने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस स्टेशनमध्ये 1) विकास भयलाल राठोड 2) महेश संतोष राठोड 3) कृष्णा गणेश राठोड (सर्व रा. कृष्णनगरतांडा) व अन्य एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!