महाराष्ट्र
Trending

अंबाजोगाईत ११ जणांची दहशत पाहून व्यापाऱ्यांनी पाटापट दुकाना बंद केल्या ! भेळ आईसक्रीमचा गाडा चालवणाऱ्या दोघां भावांना बेदम मारहाण !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – गाडा बंद केल्यानंतर बदामशेक दिले नाही या कारणावरून ११ जणांनी भेळ आईसक्रीमचा गाडा चालवणाऱ्या दोघा भावांना बेदम मारहाण केली. सिमेंटच्या विटा व लाकडी दांड्याने मारहाण केल्याने यात दोघे जखमी झाले. ११ जणांची ही दहशत पाहून परिसरातील व्यापाऱ्यांनी पाटापट दुकाना बंद करून काढता पाय घेतला. ही घटना अंबाजोगाई ते परळी जाणाऱ्या रोड लगत बस डेपोच्या समोर चौसाळकर कॉलनीत जाणाऱ्या रोडवर कमानीच्या जवळ घडली.

दत्ता जनार्धन सुरवसे (वय 35 वर्ष व्यवसाय भेळ आईसक्रीम विकणे, रा. सारनाथ नगर नागझरी परिसर अंबाजोगाई) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्यांचा भेळ व आईसक्रीमचा गाडा अंबाजोगाई ते परळी जाणाऱ्या रोड लगत बस डेपोच्या समोर चौसाळकर कॉलनीत जाणाऱ्या रोडवर कमानीच्या जवळ चालवतात. दत्ता सुरवसे यांचा भाऊ दिगाबंर हा अंबाजोगाई येथे आल्यावर भेळ व आईसक्रीमचा गाडा चालवण्यास मदत करतो. दत्ता सुरवसे हे आठ दिवसांपूर्वी देव दर्शनासाठी कर्नाटक मध्ये कृष्णगिरी येथे गेले होते. भेळ व आईसक्रीमचा गाडा त्यांचा भाऊ दिगंबर हा चालवत होता.

दिनांक 14/07/2023 रोजी नेहमी प्रमाणे भाऊ दिगंबर हा सकाळी आकरा वाजता भेळ आईसक्रीमचा गाडा चालवणे करीता बस डेपोच्या समोर चौसाळकर कॉलनीत जाणार्या रोडवर कमाणीच्याजवळ गाडा चालवित होता. दत्ता सुरवसे हे कृष्णगिरी कर्नाटक येथून रात्री साडेनऊ वाजता अंबाजोगाई येथे परतले. दत्ता सुरवसे यांना साडे नऊ वाजेच्या सुमारास भाऊ दिगंबर याने फोन करून कळवले की, आपल्या भेळच्या गाड्यावर परळीवेस येथील चौघेजण आले व मला बदाम शेकची मागणी करु लागले.

तेव्हा मी त्यांना गाडा बंद केल्याचे सांगितल्याने त्यांनी मला चापटाबुक्याने मारहाण केली, असे दिगंबर याने भाऊ दत्ता सुरवसे यांना फोनवर सांगितले. दत्ता सुरवसे हे तातडीने घटनास्थळावर पोहोचले. तेथे सौरव जोगंदड, सचिन जोगदंड, किरण मस्के हे होते. त्यावेळी दत्ता सुरवसे हे त्यांना म्हणालो की, माझ्या भावाला का मारले तेव्हा त्यांनी शिवीगाळ करून निघुन गेले. त्यानंतर काही वेळातच ते मोटार सायकलवर पुन्हा आले.

त्यापैकी एक बुलेट व इतर मोटार सायकली होत्या 1) बप्पा जोगंदड 2 ) गजाणन तीरमले 3) सौरभ जोगदंड 4) किरण मस्के 5) सचिन जोगदंड व इतर पाच ते सहा जण (सर्व रा परळीवेस अंबाजोगाई) हे आले. त्यांच्या हातात सिमेन्टच्या विटा व लाकडी दांडे होते. त्यांनी दत्ता सुरवसे व दिगंबर यांना पुन्हा शिवीगाळ केली. बप्पा जोगंदड व गजाणन तीरमले यांनी दत्ता सुरवसे यांना लाथाबुक्याने व सिमेंटच्या विटाने छातीवर तोंडावर व डोक्यात मारून मुक्का मार दिला. सौरभ जोगदंड, किरण मस्के, सचिन जोगदंड यांनी दिगाबंर याच्या डोकीत पाठीत सिमेंटच्या विटा व लाकडी दांड्याने मारुन डोके फोडून जखमी केले.

इतर पाच ते सहा लोकांनी लाथाबुक्याने मारहाण करून दिगंबर यांच्या खिशातील नगदी रोख दहा हजार रुपये सौरभ जोगदंड, किरण मस्के, सचिन जोगदंड यांनी जबरदस्तीने काढून घेतले व त्यातील इतर पैकी एकाने दिगंबरच्या मोबाईलवर लाकडी दांडा मारून मोबाईल फोडला. त्यावेळी या सर्वांची दहशत पाहून इतर व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद करून पळून गेले. दरम्यान, दत्ता सुरवसे यांचे नातेवाईक व काही लोक जमा झाल्याचे पाहून ते सर्वजण मोटार सायकलवर तेथून पळून गेले. याप्रकरणी दत्ता सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनमध्ये ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!