छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामाचे लोखंड चोरणारे वैजापूर, श्रीरामपूरचे चोरटे जेरबंद ! नागमठाण चांदेगाव शिवारातून सात क्विंटल लोखंड केले होते लंपास !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामाचे लोखंड चोरणारे वैजापूर, श्रीरामपूर तालुक्यातील तीन चोरटे पोलिसांनी जेरबंद केले. विरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागमठाण चांदेगाव शिवारातून सात क्विंटल लोखंड त्यांनी लंपास केले होते. चोरीस गेलेले हे लोखंड त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी हस्तगत केले आहे. १) लक्ष्मण उर्फ भावड्या चांगदेव भागवत वय २७ वर्षे रा महंकाळ वाडगाव ता श्रीरामपूर जि. अहमदनगर २) बाळु निवृत्ती मते वय ४५ वर्षे ३) कृष्णा राजेद्र काळे (वय ३५ वर्षे दोघे रा नागमठाण, ता. वैजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात विरगांव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस स्टेशन विरगाव येथे दि.१५/७/२०२३ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांचे नागमठाण, चादेगाव शिवारात गोदावरी नदीवर पुलाचे काम चालू असल्याने कामावरील लोखंडी गज, लोखंडी पाईप, लोखंडी प्लेटा असे सात क्विंटल वजनाचे ५६०००/- किंमतीचे लोखंडी साहित्य कामाच्या साईटवर ठेवलेल्या असताना चोरट्यांनी चोरून नेले.

यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोउपनि कदम यांच्याकडे देण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात प्राप्त गोपनिय माहीतीचे आधारे पोउपनि नवनाथ कदम, पोकॉ प्रविण अभंग, सतिष गायकवाड, शुभम रावते यानी १) लक्ष्मण उर्फ भावड्या चांगदेव भागवत वय २७ वर्षे रा महंकाळ वाडगाव ता श्रीरामपूर जि. अहमदनगर २) बाळु निवृत्ती मते वय ४५ वर्षे ३) कृष्णा राजेद्र काळे (वय ३५ वर्षे दोघे रा नागमठाण, ता. वैजापूर) याना ताब्यात घेतले.

विचारपुस करता त्यांच्याकडून चोरीस गेलेले लोखंडी गज, लोखंडी पाईप, लोखंडी प्लेटा असे ७ क्विंटल वजनाचे एकूण किंमत ५६०००/- रुपये मुदेदमाल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपीताना दि. १६ / ७ / २०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मनिष कलवानिया पोलीस अधिक्षक, सुनील लांजेवार अपर पोलीस अधिक्षक, महक स्वामी सहायक पोलीस अधिक्षक वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली विरगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एस.एस. रोडगे, पोउपनि नवनाथ कदम, पोकॉ प्रविण अभंग, सतिष गायकवाड, शुभम रावते यानी पार पाडली.

 

Back to top button
error: Content is protected !!