महाराष्ट्रवैजापूर
Trending

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा वेतनश्रेणीच्या दर्जासाठी राज्यभरात संप ! वैजापूर तालुक्यात काळ्या फिती लावून काम !!

Story Highlights
  • आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी काळ्या फिती लावून अंगणवाडीतील 3-6 वयोगटातील लाभार्थ्यांना गरमा गरम ताजा आहार वाटप केला. माया म्हस्के, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक अंगणवाडी शिक्षक भारती

संभाजीनगर लाईव्ह, दि. 20 – अंगणवाडी सेविका यांना पूर्व प्राथमिक शिक्षक दर्जा देण्यात यावा, अंगणवाडी सेविका यांना वेतनश्रेणी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी आज राज्याच्या विविध भागांत अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करून राज्य सरकारवर रोष व्यक्त केला. राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी, या प्रमुख मागणीसह प्रलंबित अन्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही राज्य सरकार दखल घेत नसल्याने राज्य भरातील अंणवाडी सेविका, मदतनीस यांनी आज, २० फेब्रुवारीपासून आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार आज राज्याच्या विविध भागांत आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडीच्या विविध संघटनांनी २० फेब्रुवारीपासून राज्यात संपाची हाक देण्यात आली होती. राज्य सरकारकडे सातत्त्याने पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. याच दरम्यान वैजापूर तालुक्यातही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काळ्या फिती लावून काम केले.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक अंगणवाडी शिक्षक भारतीच्या वतीने वैजापूरचे प्रकल्प अधिकारी यांना यापूर्वीच देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडीमध्ये काळ्या फिती लावून काम करणार आहेत. वैजापूर तालुक्यातील बोरसर, पालखेड, गाढेपिंपळगाव, लाडगाव, महालगाव या बिटामध्ये काळ्या फिती लावून काम करणार आहे. त्यानुसार आज वैजापूर तालुक्यात विविध ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी काळ्या फिती लावून काम केले.

२० फेब्रुवारी २०२३ पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी संप पुकारलेला आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या मार्गदर्शनाखाली या संप कालावधीत अंगणवाडीमध्ये काळ्या फिती लावून काम सुरु आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अंगणवाडीमध्ये ३-६ वयोगटांतील लाभार्थ्यांना गरमागरम ताजा आहार वाटप करून अंगणवाडी बंद करणार आहे व आहार वाटपाची नोंद त्या रजिस्टर मध्ये ठेवणार आहे. संप कालावधीत अंगणवाडी लाभार्थी आहारापासून वंचित राहणार नाही याची काळजी देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस घेणार असल्याचे त्यांनी प्रकल्प अधिकार्यांना लेखी कळवले होते. त्यानुसार आज वैजापूर तालुक्यातील अंगणवाडीमध्ये आहाराचे वाटप करूनच अंगणवाडी सेविकांनी काळ्या फिती लावून काम केले.

२० फेब्रुवारी २०२३ पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपकाळातील अहवाल तसेच २० फेब्रुवारी २०२३ नंतर मोबाईल मध्ये कोणतीही ऑनलाईन माहिती भरणार नाही, असा इशाराही त्यांनी यापूर्वीच दिलेला आहे. २० फेब्रुवारी २०२३ नंतरच संप कालावधीत अंगणवाडी सेविका व मदतनीस अंगणवाडीमध्ये काळ्या फिती लावून काम करणार असल्याने त्यांचे मानधन कपात करू नये, अशी विनंतीही वैजापूरचे प्रकल्प अधिकारी यांना यापूर्वीच करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष माया म्हस्के, सचिव कमल येवले, संघटक अश्विनी सोनवणे, तालुका अध्यक्ष पुष्पा जाधव, संघटक कविता चौधरी, तालुका उपाध्यक्ष आशा हारदे, संघटक मुक्ता मनाळ यांची नावे आहेत.

अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारी कर्मचार्यांचा दर्जा व वेतनश्रेणी मिळावी अशी भूमीका संभाजीनगर लाईव्हची आहे. यासंदर्भात अंगणवाडी सेविकांच्या संघटनांच्या पदाधीकारी आणि अंगणवाडी सेविकांनी parth.jagdale@gmail.com या ईमेलवर त्यांची प्रतिक्रिया भूमीका पाठवावी. त्यास योग्य ती प्रसिद्धी देण्यात येईल. किंवा 9923355999 या व्हाट्स अप क्रमांकावर निवेदन किंवा प्रतिक्रिया पाठवू शकतात.

अंगणवाडीसंदर्भातील खालील बातम्याही वाचा-

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा वेतनश्रेणीच्या दर्जासाठी २० फेब्रुवारीपासून संपाचा एल्गार ! वैजापूर तालुक्यात काळ्या फिती लावून काम करणार !!

अंगणवाडी, शाळा, दवाखाने यासारख्या सुविधा प्रत्येक तांड्यावर उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

अंगणवाड्यांसह विविध ठिकाणी जागरूक पालक सुदृढ बालक अभियान, पथकांची स्थापना ! पथकांसोबत स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका असणार !!

अंगणवाडी सेविकांच्या हल्लाबोल मोर्चाने एकात्मिक बाल विकास कार्यालय दणाणले ! 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक !!

आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला !

अंगणवाड्यांचे समायोजन होणार: ग्रामीण प्रकल्पामधील जी अंगणवाडी केंद्र नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आहेत त्यांचे नागरी प्रकल्पात समायोजन करण्याचा निर्णय !

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाने मुंबईचे आझाद मैदाण दणाणले ! मानधन व पेन्शनसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक !!

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा दिलासादायक निर्णय घेऊ, लवकरच बैठक घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश !!

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता ! मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विम्यावर सकारात्मक निर्णय घेणार !!

अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मजबूत संपर्क जाळ्याद्वारे अधिकाधिक स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचता येणार !

अंगणवाडी पर्यवेक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटलांसह अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय !!

अंगणवाडी, ग्राम पंचायतीमध्ये ‘सुकन्या समृद्धी योजनेत’ खाते उघडण्यासाठी प्रबोधन !

Back to top button
error: Content is protected !!