महाराष्ट्र
Trending

जालना: परमीट रूम हॉटेलकडून १५ हजारांची लाच घेताना भोकरदन राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील दुय्यम निरीक्षक अडकला !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- परमीट रूम हॉटेलचे नूतनीकरण करून दिल्याचा मोबदला म्हणून १५ हजारांची लाच घेताना भोकरदन येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील दुय्यम निरीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले.

संजय महादेव पवार (वय-46 वर्षे, दुय्यय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय ता .भोकरदन जि. जालना रा.जे पी नगर, भोकरदन जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांचे माहोरा ता.भोकरदन येथील परमीट रूम हॉटेलचे नूतनीकरण करून दिल्याचा मोबदला म्हणून दुय्यम निरीक्षक संजय महादेव पवार यांनी पंच साक्षीदार समक्ष रुपये 30,000/- लाचेची मागणी केली. तडजोडी अंती रुपये 15,000/- दुय्यम निरीक्षक संजय महादेव पवार यांनी स्वतः पंचा समक्ष स्वीकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, मारूती पंडित, पोलिस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी हनुमंत वारे, सापळा पथक – पोना/साईनाथ तोडकर, राजेंद्र सीनकर, चापोअं/चांगदेव बागुल यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!