छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

बिडकीन पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल १० हजारांची लाच घेताना जाळ्यात ! पतसंस्थेच्या मॅनेजरकडून पैसे घेताना रंगेहात घेतले ताब्यात !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- गुन्ह्याचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र लवकर दाखल करून पतसंस्थेचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पतसंस्थेच्या मॅनेजरकडून १० हजारांची लाच घेताना बिडकीन पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल १० हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून बिडकीन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सतीश प्रल्हादराव बोडले (वय 54 वर्षे, व्यवसाय नोकरी, पद हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर 184, नेमणूक पोलीस ठाणे बिडकीन, तालुका पैठण ,जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार पतसंस्थेचे मॅनेजर असून त्यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र लवकर दाखल करून त्यांच्या पतसंस्थेचे पैसे परत मिळवून देण्यासाठी दिनांक 2/10/23 रोजी आरोपी सतीश बोडले यांनी पंचासमक्ष 10000/रुपये लाचेची मागणी करून आज, दिनांक 3/10/2023 रोजी पंचासमक्ष 10000/रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. आरोपी सतीश बोडले यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अमोल धस, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोलिस अंमलदार भीमराज जीवडे, सुनील पाटील, विनोद आघाव चापो अंमलदार चांगदेव बागुल, (लाप्रवि छत्रपती संभाजीनगर) यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!