महाराष्ट्र
Trending

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूचे तांडव थांबेना ! ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रुग्णांच्या मृत्यूचे तांडव अद्याप पूर्णत: थांबले नसून ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याने नांदेडमधील आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिनांक ३० सप्टेंबरच्या रात्री १२.०० ते १ ऑक्टोबरच्या रात्री १२.०० या २४ तासांच्या कालावधीत एकूण मृत्यू २४ झाले. तर दिनांक १ ऑक्टोबरच्या रात्री १२.०० ते २ ऑक्टोबरच्या रात्री १२.०० या २४ तासाच्या कालावधीत एकूण मृत्यू ७ झाले. एकूण ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून कृपया घाबरू नका, कोणाला घाबरवू नका. अफवा पसरवू नका. संपूर्ण डॉक्टर्सची टीम तत्पर आहे, असे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांत अत्यवस्थ रुग्ण विशेषत: अंतिम अवस्थेतील रुग्ण जिल्ह्यातून व बाहेरून जास्त प्रमाणात आले: रुग्णालय प्रशासनाचे अजब स्पष्टीकरण

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबर २०२३ ते दि. ०१ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १२ प्रौढ रुग्ण (०५ पुरुष, ०७ महिला) व १२ बालक रुग्ण होते. प्रौढ रुग्णांमध्ये ०४ हृदयविकार, ०१ विषबाधा, ०१ जठरव्याधी, ०२ किडनी व्याधी, ०१ प्रसती गुंतागुंत, ०३ अपघात व इतर आजार याप्रमाणे व बालकांपैकी ०४ अंतिम अवस्थेत खाजगी रुग्णालयातून संदर्भित झाले होते.

रुग्णालयात अत्यावश्यक औषधीसाठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी रु. १२ कोटी निधी देण्यात आला असून आणखी रु. ०४ कोटी निधी मंजूर झाला आहे. गेल्या दोन दिवसांत अत्यवस्थ रुग्ण विशेषत: अंतिम अवस्थेतील रुग्ण जिल्हयातून व बाहेरुन जास्त प्रमाणात आले आहेत. डॉक्टर व स्टाफ लक्ष ठेवून आहेत. अनेक वर्षांपासून सदरचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत. दाखल असलेल्या इतर रुग्णांना आवश्यक तो औषधोपचार केला जात आहे.

Back to top button
error: Content is protected !!